Tuesday, February 11, 2025
HomeमानिनीHealth Tips : मानसिक आजारावर करावे हे उपाय

Health Tips : मानसिक आजारावर करावे हे उपाय

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.आपल्या शरीराप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं असते. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने शारीरिक आरोग्य, मनात नकारात्मक विचार येणे, तसेच आपल्या रोजच्या जीवनावर, कामकाजावर आणि नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करते.

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपल्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करून मानसिक आजार पळवून लावू शकता. आज आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो जाणून घेऊयात.

सकारात्मक दिनचर्या

सकाळी लवकर उठणे आणि ठराविक वेळेवर झोपणे. ध्यान, प्राणायाम आणि योगाचा सराव करणे. स्क्रीन टाइम कमी करणे आणि जास्त वेळ नैसर्गिक वातावरणात घालवणे. या सकारात्मक गोष्टी केल्याने तुम्ही सहजपणे मानसिक आजारातून बाहेर येऊ शकता.

व्यायाम

नियमित व्यायाम केल्याने हॅप्पी हार्मोन्स सक्रिय होतात. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, किंवा योगासने करणे तुमच्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यसाठी खूप फायद्याचे ठरू शकते.

आहार

मॅग्नेशियम, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, आणि बी-कॉम्प्लेक्स युक्त आहार मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो.फळे, भाज्या, शेंगदाणे, बदाम, फ्लॅक्ससीड्स, आणि मासे यांचा आहारात समावेश करा.

ध्यान आणि प्राणायाम

दररोज १०-१५ मिनिटे ध्यान केल्याने मन शांत राहते.अनुलोम-विलोम,कपालभाती प्राणायाम यांचा सराव केल्यास ताणतणाव कमी होतो.

शांत झोप

आपल्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी शांत झोप खूप महत्वाची आहे . दररोज ७-८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे.

संवाद साधा

संवाद हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संवाद साधा मानसिक आजार पळवून लावण्यासाठी संवाद अत्यंत महत्वाचा भाग असतो. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींनशी संवाद साधल्याने तुमचे मन हलके होईल यातून बाहेर पडण्यास ते तुमची मदत देखील करतील.

क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिज

ताण कमी करण्यासाठी तुम्ही काही क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिज चित्रकला, संगीत, लेखन, नृत्य यांसारखे उपक्रम तुम्ही करू शकता.

थेरपी आणि सल्ला घ्या

मानसिक आजारांचा सामना करत असल्यास योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.तज्ञांचा सल्ला घेऊन औषधे आणि थेरपी सुरू करा.

सकारात्मक विचारसरणी

प्रत्येक गोष्टीत चांगले काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा.स्वत:वर प्रेम करा आणि स्वत:ला वेळ द्या. नेहमी सकारात्मक विचार करा.

योग्य सवयी आणि सकारात्मक जीवनशैलीचे पालन केल्यास हे मानसिक आजार कमी करता येतो.

हेही वाचा : Health Tips : हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे


Edited By : Prachi Manjrekar

Manini