Friday, March 28, 2025
HomeमानिनीHoli 2025 : होळीचे रंग निवडताना घ्या ही काळजी

Holi 2025 : होळीचे रंग निवडताना घ्या ही काळजी

Subscribe

होळीचा सण रंगांचा आणि आनंदाचा असतो. परंतु होळी खेळताना आपल्या त्वचेचे आणि आरोग्याचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.मार्केटमध्ये उपलब्ध असलेले काही रंग केमिकलयुक्त असतात, जे त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित रंग निवडणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेऊयात होळीचे रंग निवडताना कोणती काळजी घ्यावी.

नैसर्गिक रंग वापरा

तुम्ही नैसर्गिक रंगाचा वापर करून होळी खेळू शकता. केमिकलयुक्त रंगांमध्ये हानिकारक पदार्थ जसे की लेड, पारा, ऑक्साइड असू शकतात, जे त्वचेसाठी आणि श्वसनसंस्थेसाठी धोकादायक असतात.त्यामुळे फुलांपासून, हळदीपासून, पालकाच्या रसापासून, चंदन, केशर, बीट यांसारख्या नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेले रंग निवडा.

ऑरगॅनिक रंगाचा वापर करा

मार्केटमध्ये मिळणाऱ्या हर्बल किंवा ऑरगॅनिक रंग त्वचेसाठी सुरक्षित आणि सहज धुवून निघणारे असतात.

गडद आणि कृत्रिम रंग टाळा

गडद रंगांमध्ये जास्त प्रमाणात रसायने असू शकतात, जे त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

डोळे आणि केसांचे संरक्षण करा

काही रंग डोळ्यांत गेल्यास जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गॉगल्स किंवा डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे वापरा. खेळायला जाण्याआधी केसांना आणि त्वचेला तेल लावून ठेवल्यास रंग लावल्यावर नंतर तो सहज धुवून निघेल.

रंग नीट तपासून पहा

नवीन रंग हातावर किंवा कानाच्या मागे लावून पहा. जर कोणतीही अ‍ॅलर्जी किंवा जळजळ झाली, तर तो रंग वापरू नका.

पर्यावरणपूरक रंग निवडा

पर्यावरणपूरक रंगाची निवड करा.रासायनिक रंग पाण्यात मिसळल्यास जलप्रदूषण होते, त्यामुळे नैसर्गिक रंग निवडून पर्यावरणाचे संरक्षण करा.

बालकांसाठी विशेष काळजी घ्या

होळीमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. मुलांची त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे केवळ नैसर्गिक किंवा हर्बल रंगाचा वापर करा. याप्रमाणे योग्य रंग निवडून होळीचा सण आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करा.

हेही वाचा : Holi 2025 : होम मेड होळीचे रंग


Edited By : Prachi Manjrekar

Manini