स्टीम घेणे हे आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. वाफ घेतल्याने आपल्याला कोणतेही आजर देखील होत नाही. त्वचेसाठी स्टीम घेणे हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. आठवड्यातून एकदा स्टीम घेतल्यास त्वचेतील मळ, तेल आणि टॉक्सिन्स सहज निघून जातात. आज आपण आठवड्यातून एकदा स्टीम घेण्याचे फायदे जाणून घेऊयात.
त्वचेमधील घाण साफ होते
स्टीम घेतल्यामुळे त्वचेमधील घाण निघून जाते. त्वचा हायड्रेट , चमकदार होते स्टीम घेतल्याने त्वचेतील मृत त्वचा काढून टाकली जाते आणि छिद्र साफ होतात.
ब्लड सर्क्युलेशन सुधारते
स्टीम घेतल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. वाफ घेतल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होतात
जर तुम्हाला ब्लॅकहेड्स किंवा व्हाइटहेड्सची समस्या असेल तर या समस्या आठवड्यातून एकदा स्टीम घेतल्याने कमी होऊ शकतात. स्टीम घेतल्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे ओपन होतात आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होतात.
हायड्रेशन वाढते
त्वचा हायड्रेट राहणे अत्यंत गरजेचं आहे. स्टीम घेतल्याने त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट आणि निरोगी राहते.
स्किन केअर
बऱ्याचदा आपण आपली त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्स वापरतो. या प्रॉडक्ट्समुळे आपली त्वचा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही घरीच स्टीम घेऊन त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि ग्लोइंग बनवू शकता.
कोरडी त्वचा
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर स्टीम घेणे खूप फायदेशीर आहे. स्टीम घेतल्याने चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. यासह, जर त्वचेवर सुरकुत्या असतील तर स्टीम ट्रीटमेंटद्वारे आपली त्वचा चांगली होऊ शकते.
स्टीम घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
- स्टीम जास्त गरम नसावी, त्वचेला जळजळ होऊ शकते.
- 5-10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ स्टीम घेऊ नका.
- अन्यथा त्वचा कोरडी पडू शकते.
- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर स्टीम घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- स्टीम घेतल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.
- तेलकट त्वचा असेल तर आठवड्यातून एकदा स्टीम घेणे उपयुक्त ठरेल.
- कोरड्या त्वचेसाठी दर 15 दिवसांनी एकदाच स्टीम घ्यावी.
हेही वाचा : Health Tips : हृदयासाठी फायदेशीर अॅवोकॅडो
Edited By : Prachi Manjrekar