Friday, January 24, 2025
HomeमानिनीParenting Tips : नावडत्या गोष्टी मुलांसमोर अशा मांडा

Parenting Tips : नावडत्या गोष्टी मुलांसमोर अशा मांडा

Subscribe

पालक म्हणून अनेकदा आपल्याला मुलांच्या वागण्यात, सवयींमध्ये किंवा निवडींमध्ये काही गोष्टी पटत नाहीत. मुलांच्या योग्य विकासासाठी आणि त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. बऱ्याचदा मुलांना हे आवडत नाही. त्यामळे पालक मुलांमध्ये अनेक मतभेद निर्माण होऊ लागतात. मुलांसमोर नकारात्मकता न आणता त्यांना शांततेने आणि सकारात्मक पद्धतीने समजवून सांगणे हे एका आव्हानाप्रमाणे असते. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी थेट कठोरपणे न सांगता, त्या मुलांसमोर कशा मांडल्या पाहिजेत हे बऱ्याचदा पालकांना कळतं नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात नावडत्या गोष्टी मुलांसमोर कशा मांडायच्या

नकारात्मक भाषेचा वापर टाळा

नावडत्या गोष्टींबद्दल बोलताना “हे वाईट आहे”, “हे चुकीचं आहे” असे स्पष्ट शब्द वापरणे टाळा. या स्पष्ट शब्दांमुळे मुलं अजून कठोर आणि हट्टी होतात. त्याऐवजी, “मला हे आवडत नाही कारण असे समजावून सांगणे जास्त प्रभावी ठरेल.

पर्याय सुचवा

नावडती गोष्ट सांगण्याऐवजी काय चांगले करता येईल, हे देखील सांगा. तुम्ही पर्याय देखील सुचवू शकता.

आवडीनिवडींचा आदर करा 

प्रत्येकाची आवड वेगळी असते. तुमच्या आवडीनिवडींवर त्यांना बंधन घालू नका. त्याऐवजी संवाद साधा आणि त्यांचे विचारही जाणून घ्या.

चुकीचे संदेश देणे टाळा

नावडती गोष्ट केवळ ट्रेंडमध्ये नाही म्हणून नकारात्मक मत व्यक्त करू नका.

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • मुलांना समजून घेण्यासाठी वेळ द्या.
  • संवादासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
  • चुकीच्या गोष्टीही प्रेमाने मांडायला शिका.
  • योग्य संवाद आणि प्रेमळ दृष्टिकोन यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडतील.

हेही वाचा : Relationship Tips : लग्नासाठी प्रपोज करताय ? घ्या ही खबरदारी


Edited By : Prachi Manjrekar

Manini