चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते अगदी वजन कमी करण्यापर्यंत चिंचेच्या पानांचा चहा अत्यंत फायदेशीर ठरतो.

मंडळी चहा तर सगळेच पितात. चहाची चव वाढवण्यासाठी चहा मध्ये आलं, वेलची, चहाचा मसाला इत्यादी पदार्थ घातले जातात. काही जण ब्लॅक टी पितात तर काही जर, ग्रीन टी ला सुद्धा पसंती देतात. पण मंडळी तुम्ही कधी चिंचेच्या पानांचा चहा घेतला आहे का ? चिंचेच्या पानांचा चहा म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण चिंचेच्या पानांचा चहा (tamarind leaf tea) पिण्याचे अनेक फायदे आहेत ते फायदे समजल्यावर तुम्ही सुद्धा हा चहा नक्की घ्याल.

आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात अनेक उपयोगी अन्नपदार्थांचा समावेश करतो. योग्य आणि सकस आहार घेतला तर त्याने आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याच प्रमाणे चिंच सुद्धा आरोग्यसाठी खूप फायदेशीर असली तरीही चिंचेच्या पानांचा चहा सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असतो हे फार कमी लोकांना माहित असेल. नेमके याचे कोणते फायदे आहेत हेच जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्या साठीच आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून ते अगदी वजन कमी करण्यापर्यंत चिंचेच्या पानांचा चहा अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊयाहा चहा कसा बनविला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत.

 

हे ही वाचा – दह्यासोबत ‘हे’ ५ पदार्थ खाणे टाळा, फायद्याऐवजी होईल तोटा

– कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते

चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. मानवी शरीरात एक चांगले आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल असते हे सर्वांनाच माहित आहे जर वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर शरीरात वाढलं. तर हृदयाशी संबंधित विकार होण्याचा धोका होतो. अश्यावेळी चिंचेच्या पानांचा चहा फायदेशीर ठरतो.

 

– वजन नियंत्रित राहते

कामाच्या वेळा, बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाचे बळी पडतात. अश्या व्यक्तींना स्वतःचे वाढलेले वजन कमी करायचे असते. वजन कमी कारण्यासाठी अनेक उपाय केले तारीही फरक पडत नसेल तर चिंचेच्या पानांचा चहा यावर गुणकारी ठरू शकतो त्याने वजन नियंत्राणात राहते.

 

हे ही वाचा – दिवसा झोपल्याने खरंच नुकसान होते का, काय सांगतं आयुर्वेद?

– रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते

चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात हे शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्याच सोबत चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म सुद्धा आढळतात, ज्याने मधुमेह नियंत्रित राहतो.

– पचनक्रिया सुधारते

चिंचेच्या पानांमध्ये असलेली पोशक तत्वे पाचक रसांना उत्तेजित करतात, त्यामुळे पचनाची प्रक्रिया सुधारते. हा चहा प्यायल्याने पचनाच्या समस्यांपासून सुटका होते.

येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.