Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenMethi Patties : टेस्टी मेथी पॅटीस

Methi Patties : टेस्टी मेथी पॅटीस

Subscribe

संध्याकाळी काही चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास एकदा तरी हे खमंग असे मेथी पॅटीस नक्की ट्राय करा.

साहित्य :
  • 1 कप मेथी
  • 2 नग बटाटे (उकलेले)
  • 1 कप मटार
  • 1 कप मक्याचे दाणे
  • 1 चमचा जिरं
  • 1 चमचा ओवा
  • लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा कसुरी मेथी
  • 1 कप बारीक चिरलेला कांदा
  • हिरवी मिरची पेस्ट
  • आलं-लसूण पेस्ट
  • पनीरचे बारीक तुकडे
  • ब्रेड स्लाइस
पॅटिसच्या आवरणासाठी
  • 2 कप बेसन पीठ
  • 1 कप तांदळाचे पीठ
  • 1 कप ओलं आणि खोबरं
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 2-3 पुदिन्याची पानं
  • 1 कप चणाडाळ भिजवलेली
  • लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर
कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. त्यामध्ये उकडलेला बटाटा, मटार, मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, तिखट-मीठ, मेथी, जिरे, ओवा, मिरची पेस्ट आणि आले-लसूण पेस्ट टाकून, हे सगळे मिश्रण एकजीव करा.
  • आता पनीरचे तुकडे फ्राय करा. नंतर ब्रेडच्या 2 स्लाइस घ्या. त्यातील एका ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावून त्यात वरील सारण भरा. मग त्यावर पनीरचे तुकडे लावा. दुसऱ्या ब्रेड स्लाइसने कव्हर करून ब्रेडला त्रिकोणी कट द्या.
  • तोपर्यंत दुसरीकडे बेसन आणि तांदळाच्या पीठाचे मिश्रण एकत्र करून, त्या पाणी घालून त्याचे थोडे घट्ट मिश्रण करून घ्या.
  • वर तयार केलेले स्लाइस या पिठाच्या मिश्रणात बुडवून अलगद तेलात सोडा. ब्राऊन रंग येईपर्यंत तेलात फ्राय करा.
  • तयार पॅटिस हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Beet Halwa : बीटापासून बनवा हेल्दी हलवा

- Advertisment -

Manini