Sunday, January 19, 2025
HomeमानिनीHealthTea Bag Disadvantages : तुम्ही टी बॅगचा चहा पिताय का?

Tea Bag Disadvantages : तुम्ही टी बॅगचा चहा पिताय का?

Subscribe

अनेकांना चहा खूप आवडतो. विशेषतः हिवाळ्यात चहा पिण्याचा आनंदच वेगळा असतो. हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकांना चहा पिणे आवडते. चहा पिण्याच्या या वाढत्या सवयी लक्षात घेता चहाच्या पिशव्या असलेला चहा अर्थात टी बॅग आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे. आळस दूर करण्यासाठी अनेकदा लोक ऑफिसमध्ये काम करताना चहा पितात. चहाच्या पिशव्यांचा वापर बहुतेक वेळा ऑफिसेस आणि हॉटेलमध्ये केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही आळस दूर करण्यासाठी वापरत असलेल्या चहाच्या पिशव्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत.
अलीकडेच याबाबतचा एक अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या ताज्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की तुम्ही टी बॅगमधून चहा प्यायल्यास तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. हा नवीन अभ्यास काय आहे ते जाणून घेऊयात.

अभ्यास काय सांगतो?

नुकत्याच बार्सिलोना विद्यापीठाने केमोस्फियरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की टी बॅगमधून चहा प्यायल्याने आरोग्यास अनेक प्रकारचे धोके पोहोचू शकतात. पॉलिमर बेस्ड असलेल्या या टी बॅग्ज , सामान्यत: नायलॉन -6, पॉलीप्रॉपिलीन आणि सेल्युलोज सारख्या पदार्थांपासून बनवल्या जातात. गरम पाण्यामध्ये या टी बॅग्ज टाकल्यानंतर त्या टी बॅग्ज मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनोप्लास्टिक्स सोडतात. हे कण आपल्या रक्तात प्रवेश करू शकतात आणि आतड्याच्या पेशींद्वारे हे कण शोषून घेतले जाऊ शकतात.

Tea Bag Disadvantages: Do you drink tea bag tea?

शास्त्रज्ञांना आढळले की पॉलीप्रॉपिलीन चहाच्या पिशव्यांपासून बनवलेल्या चहाच्या एका थेंबात सुमारे 1.2 अब्ज प्लास्टिकचे कण असतात. सेल्युलोजचे 135 दशलक्ष कण आणि नायलॉन -6 चे 8.18 दशलक्ष कण सोडले जातात. या अभ्यासातून असे दिसून आले की हे कण आतड्यांतील पेशींद्वारे शोषून घेतले जातात, जे नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात.

मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय?

मायक्रोप्लास्टिक्स हे प्लॅस्टिकचे अतिशय लहान कण असतात. हे मायक्रोप्लास्टिक्स महासागर आणि जलाशयांमध्ये जाऊन पाण्यातील प्राण्यांना धोका निर्माण करू शकतात. शिवाय, हे आरोग्यासाठी देखील हानिकारक आहेत. मेंदू, यकृत, किडनी यांसारख्या अवयवांमध्ये त्यांचा साठा होतो, ज्यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते.

हेही वाचा : New Year 2025 Gift Ideas : नवीन वर्षात प्रियजनांना देऊ शकता या खास भेटी


Edited By – Tanvi Gundaye

Manini