बहुतांश लोकांची सकाळ ही चहा-बिस्किटने होते. काही लोक बिस्कट्स चहासोबत या कारणास्तव खातात कारण त्यांना असे वाटते की, उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते. ते दिवसभरातून असे काही वेळा करतात. परंतु असा विचार तुम्ही सुद्धा करत असाल तर ते चुकीचे आहे.
तज्ञांच्या मते, अधिक बिस्किट्सचे सेवन केल्याने फॅट वाढले जाते. खरंतर बिस्किट बनवण्यासाठी रिफाइंड फ्लोर आणि हाइड्रोजन फॅट्सचा वापर केला जातो. यामुळे वजन वाढले जाते. हेच कारण आहे की, चहा सोबत बिस्किटचे सेवन करण्यापासून दूर राहिले पाहिजे.
मधुमेह वाढतो
कोणतेही जेवण जेवल्यानंतर शरिराचे वजनच नव्हे तर इंसुलिनचे प्रमाण ही वाढू लागते. खरंतर बिस्किट अधिक काळ टिकून रहावे म्हणून यामध्ये इमल्सीफायर्स, प्रिजर्वेटिव्स आणि कलरिंग सारखे केमिकल्स त्यात मिक्स केले जातात. त्याचसोबत यामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण अधिक असते जे ब्लड शुगरचा स्तर वाढवते.
सुरकुत्या पडणे
आजकाल चुकीच्या खाण्यापिण्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करु नये. खरंतर याचे मोठे कारण चहा-बिस्किटचे कॉम्बिनेशन सुद्धा आहे. कारण बिस्कुटमध्ये आढळणारे रिफाइंड शुगरमध्ये पौष्टिकत तत्व नसतात. याच कारणास्तव त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात. यासाठी वसायुक्त गोष्टींचा वापर केला पाहिजे. असे केल्याने केवळ सुरकुत्यांची समस्याच नव्हे तर पाचन क्रिया सुद्धा सुधारते.
वजन वाढणे
बिस्किटमध्ये उच्च कॅलरी आणि हायड्रोजनीकृत वसा भरपूर प्रमाणात असते. तर लठ्ठपणा ही वाढला जातो. खरंतर सामान्य बिस्किट्समध्ये कमीतकमी 40 कॅलरी असतात. तसेच क्रिम्स किंवा नुकत्याच बेक्ड केलेल्या प्रति बिस्किटमध्ये 100-150 कॅलरी असतात. या व्यतिरिक्त यामध्ये मिक्स केला जाणारा मैदा सुद्धा वेगाने वजन वाढवतो.
दातांवर होतो परिणाम
चहा-बिस्किटचे कॉम्बिनेशन दातांवर चुकीचा प्रभाव टाकतात. खरंतर चहा आणि बिस्किटमध्ये असलेले सुक्रोज दातं ठिसूळ होण्याचे कारण ठरतात. याचे सेवन केल्याने दात लवकर पडणे, दातात छिद्र होणे किंवा तोंडात बॅक्टेरिया होण्यासह काही आजार सुद्धा होतात. अशातच दात दुखणे, दातांचा रंग बदलणे, त्यावर डाग पडणे अशा समस्या उद्भवू शकतात.