परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो, पण त्याचबरोबर पालकांसाठीही ही एक मोठी जबाबदारी असते. मुलांच्या परीक्षा सुरु झाल्यावर पालकांची तारेवरची कसरत सुरु होते. यामध्ये पालकांची देखील महत्वाची भूमिका असते. अभ्यास किती झालं, कसं चालू आहे, मुलांचा आहार या सर्व गोष्टींची धावपळ पालकांची सुरु होते. परीक्षेच्या काळात मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांचा ताण कमी करणे, आणि त्यांना सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे पालकांच्या कर्तव्यांपैकी एक महत्त्वाचा भाग असतो. हा काळ खूप गंभीर असल्याने पालकांना प्रत्येक गोष्टीची दक्षता घ्यावी लागते. आज आपण जाणून घेऊयात, परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मुलांना कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे.
मुलांच्या समस्या समजून घ्या
परीक्षेचा काळ सुरु होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील जवळ आल्या आहेत. परीक्षा जवळ आल्यावर मुलांमध्ये ताणतणाव देखील वाढू लागतो . अशावेळी तुम्ही त्यांचा ताण कमी करू शकता. मुलांच्या समस्या दूर करा त्यांना कोणत्या विषय अवघड जातात ते समजून घ्या. मुलांच्या समस्या शांतपणे समजून घ्या.
मुलांना मदत करा
काही पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मुलं देखील आपल्याला समस्या सांगत नाही अशावेळी मुलांना विचारा अभ्यासात त्यांची मदत करा.
वेळापत्रक तयार करा
बोर्डाच्या किंवा इतर परीक्षा सुरु व्हायला आता एक महिना शिल्लक आहे. या दरम्यान बऱ्याचदा मुलांना कळतं नाही ? कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे कसं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायचा अशावेळी तुम्ही एक वेळापत्रक बनवा. त्या वेळापत्रकानुसार मुलांना अभ्यास करायला सांगा. अशाने मुलांचा अभ्यासाचा ताण देखील कमी होईल. आणि मुलांचा अभ्यास वेळेवर पूर्ण झाल्यामुळे त्यांना चांगले मार्के मिळतील.
अवघड विषय आधी सोडवा
तुम्हाला जे विषय अवघड वाटतात. ते आधी सोडवायला घ्या. त्या विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करा. पालकांनी हे अवघड विषय मुलांना नीट समजवून सांगावे. सोपे विषय कव्हर करायला वेळ लागत नाही. परंतु अवघड विषय सोडवायला बराच वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही आधी अवघड विषय सोडवा. जेणेकरून संपूर्ण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करता येईल.
पेपर सोडवा
मुलांना पेपर सोडवायला सांगा. जुने पेपर देखील सोडवून घ्या. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल पेपर कसा येणार आहे, प्रश्न कसे येतील. मुलांचा देखील सराव होईल.
आत्मविश्वास वाढवा
आत्मविश्वास हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तुम्ही परीक्षेला जाताना किंवा परीक्षेच्या आधी मुलांचा आत्मविश्वास वाढवा. त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्या प्रोत्साहानामुळे मुल पेपरला जाताना टेन्शन फ्री
या टिप्समुळे मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळतील.
हेही वाचा : Exam Preparation : परीक्षेच्या तयारीला लागा
Edited By : Prachi Manjrekar