हल्ली ‘टेन्शन’ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. मोठ्यांना कामाचं, पैशांचं टेन्शन, तर लहानांना भविष्याचं,अभ्यासाचं, रिलेशनशिपचं टेन्शन. हे टेन्शन एकदा का आलं की छाती धडधडायला लागते. अस्वस्थ वाटतं, डोकेदुखीने व्यक्ती हैराण होतं , भूक-झोप उडालेली असते. अनामिक भीतीने व्यक्ती त्रस्त असते. पण तुम्हांला माहित आहे का हे टेन्शन घालवण्याचे काही शास्त्रोक्त उपायही आहेत. ज्यांच्या वापर करून आपण कोणत्याही औषध गोळ्या न घेता टेन्शन घालवू शकतो.
- प्राणायाम
तणावमुक्त राहण्यासाठी योगाभ्यास फार गरजेचा आहे. त्यातही प्राणायम ही प्रक्रिया केवळ तुमचे फुफ्फुसचं निरोगी ठेवत नाही तर तुमचे मनही निरोगी ठेवते. श्वासाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवण्याचे तंत्र म्हणजे प्राणायाम. यामुळे टेन्शन घालवण्यासाठी दररोज १० मिनिटे दिर्घश्वासाचे योग करावा.
- नृत्य- संगीत
मनोविकारतज्ज्ञांच्या मतानुसार टेन्शन घालवण्यासाठी नृत्य म्हणजे डान्स आणि गाणी हे महत्वाचे काम करतात. कारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला टेन्शन येते त्यावेळी शरीरात कार्टीसोलचा स्तर कमी होतो. तर डान्स केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे तणाव कमी होऊन मूड फ्रेश होतो.
- १० मिनिटे चालणे
टेन्शन आल्यावर जर मोकळ्या हवेत दहा मिनिटे चालणे झाले तर अँग्झायटी कमी होते. शांत वाटते. यामुळे चालणे हा टेन्शन घालवण्यासाठी उत्तम व्यायाम आहे.
हेही वाचा :