Thursday, January 2, 2025
HomeमानिनीHealthAlcohol Habits : या हार्मोन्समुळे महिलांना जडतं दारुचं व्यसन

Alcohol Habits : या हार्मोन्समुळे महिलांना जडतं दारुचं व्यसन

Subscribe

उंदरांवर केलेल्या प्री-क्लिनिकल अभ्यासात महिलांच्या दारूच्या व्यसनाबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासानुसार, असे सांगण्यात आले आहे की शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी वाढल्याने महिलांना दारूचे व्यसन लागू शकते. शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रीक्लिनिकल अभ्यासानुसार, महिलांचे सेक्स हार्मोन इस्ट्रोजेन महिलांच्या अल्कोहोलचे सेवन करण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवत असते, जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आले आहे की इस्ट्रोजेनच्या उच्च पातळीमुळे महिलांची जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची प्रवृत्ती वाढू शकते आणि या शोधामुळे त्यांचे वर्तन समजण्यास मदत होऊ शकते.

यासाठी स्त्रिया जास्त दारू पितात :

हे संशोधन केलेल्या संशोधकांच्या म्हणण्यांनुसार, महिलांमध्ये दारू पिण्याचे वर्तन कशामुळे होते याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे, कारण मद्यपानाचे बहुतेक अभ्यास पुरुषांवर केले गेले आहेत . तरीही अलीकडील अभ्यास असा दर्शवतो की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त मद्यपान करतात.

- Advertisement -

तज्ज्ञांनी सांगितले की, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दारू पिण्याच्या सवयीमुळे अल्कोहोलचा हानिकारक प्रभाव शरीरावर होऊ शकतो. त्यांच्यामते अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांमुळे महिलांमध्ये अल्कोहोल कन्ज्युम करण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपचार करण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. इस्ट्रोजेनचा अल्कोहोल कन्ज्युम करण्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी संशोधकांच्या टीमने प्रथम मादी उंदरांच्या ओस्ट्रस सायकल दरम्यान हार्मोनच्या पातळीचे परीक्षण केले (स्त्रियांच्या मासिक पाळी प्रमाणेच) आणि नंतर त्यांना अल्कोहोल देण्यात आले.

- Advertisement -

याचा परिणाम स्त्रियांवर कसा होतो हे शोधताना असे दिसून आले की स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी असते तेव्हा ते कमी प्रमाणात अल्कोहोल कन्ज्युम करतात. संशोधनानुसार, जेव्हा एखादी महिला वाईनच्या बाटलीतून पहिला घोट घेते तेव्हा तिचे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात. जर ती उच्च-इस्ट्रोजेन अवस्थेत असेल तर ते आणखी नियंत्रणाबाहेर जातात. अभ्यासाच्या आधारे त्यांनी सांगितले की अतिरिक्त न्यूरल ॲक्टिव्हिटीचा परिणाम उंदरांवर दिसून येतो. त्यावरूनच हे स्पष्ट झाले की जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी वाढली तेव्हा मादी उंदराने जास्त मद्य सेवन केले. ही स्थिती प्रयोगाच्या पहिल्या 30 मिनिटांतच स्पष्ट झाली. याचाच अर्थ असा की, स्त्रियांच्या शरीरात जेव्हा इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते तेव्हा त्या जास्त दारू पितात.

हेही वाचा : Tomato Juice : रिकाम्यापोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे फायदे


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini