Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीBeautyAloevera Gel Disadvantages : रॉ अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावण्याचे दुष्परिणाम

Aloevera Gel Disadvantages : रॉ अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावण्याचे दुष्परिणाम

Subscribe

अॅलोवेरा जेलला नैसर्गिक आणि निरुपद्रवी घटक म्हणून ओळखले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की टी ट्री ऑईल आणि अॅलोवेरा जेल जर कच्च्या स्वरूपात किंवा पातळ न करता वापरले तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या त्वचेचे प्रकार आणि संवेदनशीलता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. काही लोकांना कच्च्या कोरफडीमुळे कोणतीही समस्या येऊ शकत नाही, तर काहींना खाज सुटणे, पुरळ उठणे आणि ऍलर्जी निर्माण होऊ शकते. वास्तव असे आहे की कच्ची कोरफड प्रत्येक प्रकारच्या त्वचेला सूट होत नाही आणि त्याचा वापर केल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला खोल ओरखडे किंवा जखमा असतील तर तुम्हाला कच्च्या अॅलोवेरा जेलपासून दूर राहायला हवे. एखाद्या ऑपरेशननंतर राहिलेले व्रण भरुन येण्याची जी नैसर्गिक क्षमता असते ती या कच्च्या कोरफडीमुळे कदाचित कमी होऊ शकते.

अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अॅलोवेरा जेल लावताना हलकी खाज सुटणे किंवा जळजळ जाणवू शकते, परंतु पुरळ किंवा अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी यासारख्या गंभीर समस्याही यामुळे निर्माण होऊ शकतात अशा समस्यांना त्वरित बंद करणे आवश्यक आहे. शिवाय, जर तुमच्या त्वचेला एखादा संसर्ग झाला असेल तर अशावेळीही कच्चे अॅलोवेरा जेल त्वचेवर लावणे टाळावे.

Aloe Vera Gel Disadvantages: Side effects of applying raw aloe vera gel on the face

कच्चे अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने होणारे दुष्परिणाम

ऍलर्जी :

काही लोकांना कच्च्या अॅलोवेरा जेलची ऍलर्जी असते, परिणामी लालसरपणा, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे आणि त्वचेवर पुरळ यांसह अनेक त्वचारोगाची लक्षणे त्यांना दिसू शकतात. जर तुमच्या त्वचेवर ही चिन्हे तुम्हाला दिसत असतील तर ताबडतोब याचा वापर बंद करा. अधिकच त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांची मदतही घेऊ शकता.

त्वचेची जळजळ :

कधीकधी जेल लावल्यानंतर लगेचच त्वचेची जळजळ होऊ लागते आणि त्वचेला खाज सुटते.

कोरडेपणा :

कच्च्या कोरफडीचे जेल चेहऱ्यावर दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर कोरडेपणा येऊ शकतो.

स्किन बर्निंग :

जर तुमची त्वचा फारच संवेदनशील असेल तर तुमच्या त्वचेचा काही भाग जळल्यासारखाही होऊ शकतो.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता अॅलोवेरा जेल लावण्यापूर्वी ते त्वचेच्या लहानशा भागावर लावून त्याची टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Malaika Arora : ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरविषयी पहिल्यांदाच बोलली मलायका


Edited By – Tanvi Gundaye

Manini