Monday, January 13, 2025
HomeमानिनीConfidence Boosting Tips : वारंवार होणाऱ्या अपमानाला कसे सामोरे जाल ?

Confidence Boosting Tips : वारंवार होणाऱ्या अपमानाला कसे सामोरे जाल ?

Subscribe

आपल्या सर्वांकडे कोणीतरी एक व्यक्ती अशी असते जिच्याशी आपण सर्व विषयांवर बोलू शकतो. कोणत्याही प्रकारचा विनोद करू शकतो. एकमेकांची खिल्लीही उडवू शकतो. एकमेकांमध्ये असलेल्या एका कनेक्शनमुळे आपण हे सर्व एकमेकांसोबत करू शकतो. परंतु प्रत्येक वेळी जी गोष्ट आपल्याला हसवते ती विनोद असतेच असे नाही. काल ज्या गोष्टींनी तुम्हाला हसायला येत होते आज त्याच गोष्टी तुम्हाला टोमणे आणि अपमान वाटू शकतात.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही परिस्थितीला नीट हाताळले नाही , तर कधी कधी प्रकरण आणखी बिघडते. अशा परिस्थितीत, जो तुमचा अपमान करतो किंवा तुम्हाला टोमणा मारतो त्याच्याशी कसे वागावे यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.

- Advertisement -

स्वतःला शांत ठेवा :

जर कोणी तुम्हाला टोमणे मारत असेल किंवा काही वैयक्तिक टिप्पणी करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांत राहायला हवे . तुम्ही लगेचच प्रतिसाद देण्याचे टाळले पाहिजे. समोरची व्यक्ती काय म्हणत आहे आणि का म्हणत आहे हे तुम्ही पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. योग्य वेळ आल्यावर त्या प्रश्नाचे नम्रपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहि़जे.

दुर्लक्ष करायला शिका :

अनेकवेळा जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलेल आणि तुम्हाला टोमणा मारेल किंवा प्रत्येक वेळी इतरांसमोर तुमचा अपमान करेल तेव्हा तुम्हाला उत्तर देण्याची गरज नाही. कधीकधी शांत राहिल्याने देखील परिस्थिती सुधारू शकते. उत्तर दिल्याने वाद निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचा मूडही खराब होईल. अशावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीला काहीही सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत दुर्लक्ष करणे चांगले .

- Advertisement -

Confidence Boosting Tips: How to deal with frequent insults?

गोड हसून उत्तर द्या :

जर कोणी तुम्हाला टोमणा मारत असेल आणि तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय काही पर्याय नसेल तर तुम्ही रागाने उत्तर देणे टाळायला हवे. त्याऐवजी तुम्ही गोड हसून प्रतिसाद द्या. त्यामुळे वातावरण इतके खराब होणार नाही.

योग्यरित्या शब्द निवडा :

जर कोणी तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर आधी स्वतःला शांत ठेवा. योग्य शब्द निवडल्यानंतरच प्रतिसाद द्या. याद्वारे तुम्ही तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडू शकाल.

तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा :

जर कोणी तुमचा अपमान करत असेल किंवा तुम्हाला समजून घेत नसेल तर तो तुमचा नसून समोरच्याचा दोष आहे. तुम्ही तुमचा आत्मविश्वास कायम ठेवावा. आपण पुढे जात राहिले पाहिजे. लक्षात ठेवा जगातील प्रत्येकजण तुम्हाला खाली आणण्यासाठीच पुढे येईल. त्यामुळे, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Smartphone Box reuse : असा करा स्मार्टफोन बॉक्सचा पुनर्वापर


Edited By –  Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini