Friday, January 24, 2025
HomeमानिनीBeautyDry eyelashes : थंडीमुळे कोरड्या पडलेल्या पापण्यांना असे करा मॉईश्चरायझ

Dry eyelashes : थंडीमुळे कोरड्या पडलेल्या पापण्यांना असे करा मॉईश्चरायझ

Subscribe

हिवाळ्यात थंड वारे आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे त्वचा अनेकदा कोरडी पडते. हात-पाय, चेहरा यांच्यासोबतच डोळ्यांच्या पापण्याही काही वेळा कोरड्या होतात. यामागे इतरही अनेक कारणे आहेत. हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा सर्व ओलावा शोषून घेते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. याचाच परिणाम म्हणून पापण्या देखील कोरड्या होऊ लागतात आणि त्यावर एक कवच तयार होऊ लागते. अशा परिस्थितीत कधी कधी डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, पाणी येणे असे प्रकार सुरू होतात. यासाठीच त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमच्या त्वचेसोबत तुमच्या पापण्याही कोरड्या पडत असतील तर तुम्ही त्यांना लवकरात लवकर बरे करण्याचे मार्ग शोधायला हवेत. आज आपण जाणून घेऊयात की जर डोळ्यांच्या पापण्या कोरड्या पडत असतील तर नेमके काय उपाय करायला हवेत याबद्दल.

एरंडेल तेल

Dry eyelashes: Moisturize dry eyelashes due to cold

डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर आहे . एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल. केस आणि त्वचा या दोन्हींसाठी हे तेल खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म आपल्या शरीराला आर्द्रता पुरवतात. हे लावल्याने डोळ्यातील अश्रूंमध्ये असलेले नैसर्गिक तेल वाढण्यास मदत होते. अशा स्थितीत तुमच्या पापण्या कोरड्या होत नाहीत. डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि खाज येण्याची समस्याही दूर होण्यास मदत होते.

पापण्यांना तेल लावण्याची पद्धत :

सर्व प्रथम, आपले हात पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा.
यानंतर एरंडेल तेलाचे काही थेंब बोटांवर घेऊन पापण्यांवर थापा.
रात्रभर राहू द्या व सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने डोळे धुवा.

गुलाबजल लावा :

Dry eyelashes: Moisturize dry eyelashes due to cold

कधीकधी हिवाळ्यात, हीटरसमोर जास्त वेळ बसल्याने देखील पापण्या कोरड्या किंवा चिकट होऊ शकतात. यासाठी कापूस घ्या, तो हलकेच गुलाबजलामध्ये बुडवा आणि पापण्यांवर लावा. असे केल्याने तुमच्या डोळ्यांना त्वरित थंडावा आणि आराम मिळेल आणि ते चिकटही राहणार नाहीत व कोरडेही दिसणार नाहीत.

योग्य आहार :

Dry eyelashes: Moisturize dry eyelashes due to cold

याशिवाय पापण्या कोरड्या होण्याचे आणखी एक कारण म्हणजे अपूर्ण आहार. यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा. संत्री , मोसंबी यासारखी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याला प्राधान्य द्या.

हेही वाचा : Winter Beauty Tips : हिवाळ्यात चेहऱ्यावरील ग्लो असा ठेवा कायम


Edited By – Tanvi Gundaye

Manini