Saturday, January 11, 2025
HomeमानिनीGardening Tips : घरीच बनवा टोमॅटोच्या रोपासाठी खत

Gardening Tips : घरीच बनवा टोमॅटोच्या रोपासाठी खत

Subscribe

घरच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये ताजे आणि चवदार टोमॅटो वाढवणं हे आता सोपे झाले आहे. जर तुम्ही हिवाळ्याच्या काळात घरी टोमॅटो पिकवत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अनेक वेळा, बागकामाची आवड असणारे लोक त्यांच्या घरात टोमॅटोची रोपे लावतात, परंतु त्यांची योग्य काळजी घेणे त्यांना शक्य होत नाही, ज्यामुळे झाडे आपोआप सुकू लागतात. त्याचबरोबर त्यात फुले व फळेही वाढणे थांबते.

टोमॅटोची काळजी घेणे तसे फारसे अवघड नाही. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बागेत चवदार आणि रसाळ टोमॅटो उगवू शकता. मात्र, यासाठी जमिनीत पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या टोमॅटोचे रोप निरोगी आणि फलदायी बनवायचे असेल तर, बाजारातील खतांऐवजी तुमच्या बागेत असलेल्या काही गोष्टींचा वापर करून उत्कृष्ट टॉनिक खत तयार करून तुम्ही ते वापरू शकता.

- Advertisement -

बागेत असलेल्या या वस्तूपासून तयार करा सेंद्रिय खत :

टोमॅटोच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही तुमच्याच बागेतील काही गोष्टी वापरून घरी खत तयार करू शकता. जर तुम्हाला बागकामाची आवड असेल तर तुमच्या घरात इतर झाडेदेखील असतीलच. या झाडांची पाने पिकल्यानंतर गळून पडतात. ही पिकलेली पानं निरुपयोगी आहेत असे समजून कचऱ्यात टाकून दिली जातात. पण या ऐवजी तुम्ही ही पाने गोळा करून टोमॅटोच्या रोपांसाठी घरगुती खत तयार करू शकता. या खतामुळे झाडांना पोषक तत्वे मिळतील आणि त्यांची वाढ जलद होण्यास मदत होईल. परंतु यासाठी ते तयार करण्याची पद्धत जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

Gardening Tips: Make fertilizer for tomato plants at home

- Advertisement -

पानांपासून टोमॅटोसाठी घरगुती खत कसे बनवायचे?

बागेतील सर्व पाने गोळा करून बादलीत ठेवा.
त्यात काही मातीचे कण आणि गांडुळे घाला.
यानंतर स्वयंपाकघरातील फळे आणि भाजीपाला असे टाकाऊ पदार्थ या बादलीत टाका.
हे भांडे झाकून ठेवा आणि 15 दिवस असेच राहू द्या.
15 दिवसांनंतर तुम्हाला दिसेल की या सर्व गोष्टी एकत्र मिसळून त्यांनी कंपोस्टचे रूप घेतले आहे.
आता, तुम्ही टोमॅटोच्या रोपांकरता हे पोषक तत्त्वांनी युक्त खत वापरू शकता.

घरगुती खत टोमॅटोच्या झाडांना घालण्याची योग्य पद्धत :

सर्वप्रथम, टोमॅटो रोपाच्या मुळांजवळील माती खोदून घ्या.
यानंतर त्यामध्ये तयार केलेले घरगुती खत टाका.
नंतर त्यात योग्य प्रमाणात पाणी घाला.
रोज सकाळी हे केल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला याचा परिणाम दिसेल. टोमॅटोची रोपे चांगली वाढू लागतील.

हेही वाचा : Christmas Home Decoration : ख्रिसमसला या पद्धतीने घर सजवा


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini