Friday, January 10, 2025
HomeमानिनीFashionJewellery Design : या टिप्सने हेवी नेकलेसमुळे होणार नाहीत वेदना

Jewellery Design : या टिप्सने हेवी नेकलेसमुळे होणार नाहीत वेदना

Subscribe

जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होतो, तेव्हा आपण आपल्या पोशाखाबरोबरच ॲक्सेसरीजवरही तितकेच लक्ष केंद्रित करतो. जर तुम्ही एखाद्या साध्या पोशाखात जड नेकलेस घातला तर तुमचा लूक ल़गेच बदलतो आणि तुम्ही पार्टीसाठी तयार होता. जड नेकलेसमुळे तुम्ही खूप स्टायलिश दिसता यात शंका नाही. परंतु त्याच वेळी, यामुळे तुमच्या मानेमध्ये वेदना देखील होऊ शकतात, विशेषत: जर तुम्हाला इतके जास्त वजन उचलण्याची सवय नसेल, तर तुम्हाला नक्कीच खूप अस्वस्थता जाणवू शकते.

बहुतेक मुली त्यांच्या लूकशी तडजोड करतात आणि वेदना टाळण्यासाठी हलके नेकपीस घालतात. मात्र तुम्हाला असं करण्याची अजिबात गरज नाही. काही सोप्या स्टाइलिंग हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचा लूक आकर्षक बनवू शकता. गळ्यात डंबेल लटकवून आपण फिरतोय की काय असं अजिबात तुम्हाला वाटणार नाही. कोणतीही काळजी न करता फक्त स्टेटमेंट नेकलेस घाला आणि तुमचा लूक छान करा. आजच्या या लेखात जाणून घेऊयात
अशाच काही स्टायलिंग हॅक्सविषयी.

- Advertisement -

पॅडिंगचा वापर करा :

जेव्हा तुम्ही जड नेकलेस घालता तेव्हा त्यासोबत पॅडिंग घालणे खूप चांगले मानले जाते. नेकलेसच्या खाली फक्त पातळ फोमची पट्टी किंवा मऊ कापड चिकटवा, विशेषतः जर त्यात खडबडीत किंवा जड तुकडे असतील. हे दाब कमी करण्यासाठी आणि त्वचेची जळजळ टाळण्यासाठी मदत करू शकतील.

मानेप्रमाणे अॅडजस्ट करा :

एक्सटेंडरच्या मदतीने नेकलेसचे वजन योग्यरित्या बॅलेन्स केले जाऊ शकते. जर नेकलेस खूप घट्ट वाटत असेल तर एक्सटेंडर वापरुन तुम्ही त्याला खाली खेचू शकता. ज्यामुळे नेकलेसचे वजन योग्यरित्या वितरित होऊ शकेल. सोबतच नेकलेस आपल्या आऊटफिटसोबत जोडून ठेवण्यासाठी लहान सेफ्टी पिनचा किंवा फॅशन टेपचा वापर करा. यामुळे तुमच्या मानेवरील वजन कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे तुम्हाला अधिकच कम्फर्टेबल वाटू लागेल. आणि नेकलेस आजूबाजूला फार विस्कळीत पद्धतीने घसरणारही नाही.

- Advertisement -

Jewellery Design: These tips will not cause pain due to heavy necklaces

योग्य पोशाखासोबत करा मॅच :

जड नेकलेस तुम्ही कोणत्या प्रकारच्या पोशाखावर घालत आहात हेदेखील महत्त्वाचे आहे. कॉटन किंवा लिनेनसारख्या स्ट्रक्चर्ड फॅब्रिकसोबत हे दागिने स्टाईल करा. याव्यतिरिक्त, जर पोशाखाची नेकलाइन हाय नेक,बोट नेक किंवा कॉलर शर्ट असेल तर यामुळे नेकलाईनला एक मजबूत बेस मिळतो. आणि नेकलेस तुमच्या त्वचेवर थेट दबाव आणत नाही. त्याच वेळी, जर तुम्ही व्ही-नेक किंवा ऑफ-शोल्डर आउटफिट घालायचे ठरवले तर,
तुमचा नेकलेस कमीत कमी तुमच्या कपड्यांवर टिकून राहिल व आजूबाजूला घसरणार नाही याची काळजी घ्या. जेणेकरून तुम्हाला वेदना होणार नाहीत.

योग्य नेकलेस निवडा :

हेवी लूक नेकलेसचा अर्थ असा नाही की तुम्ही खरोखर भारी नेकलेस घालावा. नेकलेसचे मटेरिअल हुशारीने निवडून तुम्ही हलके हेवी लूक नेकलेसदेखील कॅरी करू शकता.

हलक्या मिश्र धातू किंवा पोकळ डिझाइनने बनवलेले हेवी नेकपीस घालण्याचा प्रयत्न करा . दुसरीकडे, जर तुम्ही पारंपारिक हेवी नेकपीस परिधान करत असाल, तर तुम्ही रुंद बेस असलेल्या डिझाइन्सला प्राधान्य द्या. ज्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी फार वजन जाणवणार नाही.

हेही वाचा : Hair Care : या चुकांमुळे अकाली पिकतात केस


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini