ज्याप्रमाणे शरीराच्या आकारानुसार कपडे परिधान केल्यावर आपला लूक सुधारतो. त्याचप्रमाणे कोणत्याही आउटफिटसोबत, जोपर्यंत त्या ड्रेसशी ॲक्सेसरीज मॅच होत नाहीत, तोपर्यंत तुमचा लूक आकर्षक दिसणार नाही. अशा परिस्थितीत ड्रेस कॅरी करण्यासोबतच दागिन्यांचे कॉम्बिनेशन कसे निवडायचे हे देखील जाणून घेतले पाहिजे. नेकलेसचा विचार केला तर सूट किंवा ब्लाउजच्या नेकलाईन नुसार नेकलेसची निवड करावी. असे केल्याने तुम्ही पार्टीमध्ये खूपच अॅट्रेक्टिव्ह लूक मिळवू शकता.
सध्या बाजारात अनेक डिझाइन्स आणि मटेरियलचे नेकलेस उपलब्ध आहेत. त्यांना कसे स्टाईल करावे हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. खरं तर, प्रत्येक प्रकारचे नेकपीस प्रत्येक ड्रेस आणि नेकलाइनला शोभत नाहीत. अशा परिस्थितीत कोणता नेकलेस कोणत्या आऊटफिटवर पेअर करायचा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आउटफिट घातल्यानंतर दागिन्यांच्या निवडीत तुमचाही गोंधळ होत असेल तर आज आपण जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.
मिरर वर्क चोकर :
तुम्ही तुमच्या कोणत्याही गोल नेकलाइन सूट किंवा ब्लाउजसोबत मिरर वर्क चोकर घालू शकता. अशा नेकलेसमध्ये तुमचा लूक पूर्णपणे पारंपरिक दिसेल. यासोबत तुम्ही मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्टिंग कानातलेही पेअर करू शकता. असा नेकपीस परिधान केल्यावर तुमचा मेकअप हलका ठेवा. तसेच, तुम्ही हे नेकलेस प्रत्येक प्रसंगी कॅरी करू शकता.
पर्ल चोकर नेकपीस :
गोल गळ्याला स्मार्ट टच देण्यासाठी मोत्याचा चोकर नेकलेस हा प्रकारही उत्तम आहे. हे कॅरी केल्यावर तुमचा लूक रॉयल दिसतो. जर तुम्ही ब्लाऊजसोबत हे कॅरी केले तर तुमचा लूक एकदम परफेक्ट दिसेल. तुम्हाला हे ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज मिळतील. यासोबत तुम्ही बन हेअरस्टाईल आणि ग्लॉसी मेकअप करू शकता.
स्लीक स्टोन नेकलेस :
जर तुम्हाला काही जड ट्राय करावेसे वाटत नसेल, तर स्टोन नेकलेस तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रकारचा नेकलेस गोल गळ्यासाठी योग्य आहे. तुम्ही कोणत्याही छोट्या फंक्शनसाठी हे स्टाइल करू शकता. यासह खुल्या कुरळ्या केसांमुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळू शकेल.
फॉइल नेकलेस :
या प्रकारच्या फॉइल नेकलेसमुळे खूप सुंदर लूक येतो. हे कॅरी केल्यावर तुमचा लूक आणखी स्टायलिश होतो. यासोबत मॅचिंग इअररिंग्समुळे तुमचा लूक परिपूर्ण होऊ शकेल. साडीसोबत या नेकलेसचा लूक खूपच सुंदर दिसतो. अशा नेकलेसमध्ये तुम्हाला मीनाकारी वर्कही मिळू शकेल . हे तुम्ही तुमच्या आउटफिटसह स्टाइल करू शकता.
हेही वाचा : Pancard Precautions : पॅनकार्ड वापरताना राहावे सावध
Edited By – Tanvi Gundaye