Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीNew Year 2025 : नववर्ष साजरे करण्याच्या अनोख्या पध्दती

New Year 2025 : नववर्ष साजरे करण्याच्या अनोख्या पध्दती

Subscribe

नवीन वर्षासाठी फार दिवस उरलेले नाहीत. त्यामुळे सर्वत्र लोक नववर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत. संकल्पांचा विचार करण्यापासून ते नववर्षाच्या पार्टीचे नियोजन करण्यापर्यंत लोकांमध्ये नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे वेगवेगळे मार्ग वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, ज्याची वर्षानुवर्षे परंपरा चालत आली आहे. आजच्या या लेखातून आपण जाणून घेऊयात, जगभरात नवीन वर्ष कसे साजरे केले जाते याविषयी.

जपान-कोरिया :

New Year 2025 : Unique ways to celebrate New Year

आशियाई देशांबद्दल बोलायचे झाल्यास जपान आणि कोरियामध्ये नवीन वर्षाची विशेष चमक दिसून येते. या दोन्ही देशांमध्ये घंटा वाजवून नववर्षाचे स्वागत केले जाते. तेही एक-दोनदा नाही तर 108 वेळा. होय, येथे नवीन वर्षाच्या दिवशी 108 वेळा घंटा वाजवणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र लोक घंटा वाजवताना दिसतात.

नेदरलँड्स :

New Year 2025 : Unique ways to celebrate New Year

नेदरलँड्समध्ये नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत थोडी अनोखी आहे. यानिमित्ताने ॲमस्टरडॅम शहरात एक विशेष चकाकी पाहायला मिळते. येथे नवीन वर्ष साजरे करण्याची पद्धत खूप खास आहे. या दिवशी नवीन वर्षाचा शुभारंभ करण्यासाठी लोक पहाटे समुद्राच्या पाण्यात डुंबतात. त्यासाठी ते श्वेनिंजन बीचवर जमतात. असे मानले जाते की समुद्रात डुबकी घेतल्याने नवीन वर्ष चांगले जाते.

अमेरिका :

New Year 2025 : Unique ways to celebrate New Year

अमेरिकेत, टाईम स्क्वेअरवर नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. नवीन वर्षाच्या काउंटडाऊनमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात. या निमित्ताने टाइम्स स्क्वेअरजवळ लोक जमतात आणि सर्वांच्या नजरा झेंड्याच्या खांबावर खिळलेल्या असतात. येथून एक चेंडू खाली पडतो, जो काउंट डाउनचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच अमेरिकन शहरातील लोक उंचावरून वस्तू खाली फेकतात. जसे की कलिंगड.

स्पेन :

New Year 2025 : Unique ways to celebrate New Year

स्पेनमधील नवीन वर्ष माद्रिद शहरात किंवा कॅनरी बेटांवर साजरे केले जाते. स्पेनच्या नवीन वर्षाच्या परंपरेनुसार 12 द्राक्षे खाल्ली जातात. रात्री 12 वाजता लोक 12 महिन्यांच्या नावे 12 द्राक्षे खातात. यावेळी 12 घंटा वाजवल्या जातात आणि प्रत्येक घंटेसोबत एक द्राक्ष खाल्ला जातो.असे केल्याने सुखसमृद्धी येते अशी धारणा आहे म्हणूनच त्यांना ‘नशिबाची द्राक्षे’ असेही म्हणतात. या प्रथेचे पालन करून लोक नाचत गात नवीन वर्षाचे स्वागत करतात.

कंबोडिया :

New Year 2025 : Unique ways to celebrate New Year

कंबोडियामध्ये, लोक नवीन वर्षाच्या दिवशी मंदिरांमध्ये अगरबत्ती आणि धूप जाळतात. या वेळी लोक भगवान बुद्धांकडे प्रार्थना करतात. वर्षाच्या दुसऱ्या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करतात. या दिवशी गरिबांना दानही दिले जाते. तिसऱ्या दिवशी लोक आपल्या वडिलांचे आणि भगवान बुद्धांचे पाय धुतात. नकारात्मकता दूर करण्यासाठी हे केले जाते असा समज आहे.

हेही वाचा : Salman Khan Birthday : 59 व्या वर्षातही हँडसम हंक आहे ‘दबंग भाईजान’


Edited By – Tanvi Gundaye

Manini