Saturday, January 18, 2025
HomeमानिनीNew Year's resolution : उत्तम आरोग्यासाठी नववर्षात करा हे संकल्प

New Year’s resolution : उत्तम आरोग्यासाठी नववर्षात करा हे संकल्प

Subscribe

नवीन वर्ष, नवीन सुरुवात! दरवर्षी आपण नवनवीन संकल्प करत असतो, ज्यामध्ये आरोग्याशी संबंधितही काही निर्णय असतात. परंतु, आपण हे संकल्प काही आठवड्यांतच विसरतो. हे सहसा घडते कारण आपण अपेक्षेपेक्षा जास्त संकल्प करत असतो. म्हणूनच जाणून घेऊयात आरोग्यविषयक काही असे संकल्प जे तुम्ही सहज करू शकता.

संतुलित आहार :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

रंगीबेरंगी प्लेट-
तुमची प्लेट रंगीबेरंगी करा. तुमच्या आहारात विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये आणि धान्यांचा समावेश करा.
जंक फूडपासून दूर राहा-
प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि फॅट्स वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.
भरपूर पाणी प्या –
दिवसभरात किमान 7-8 ग्लास पाणी प्या.
मधल्या वेळेत स्नॅक्स घ्या –
दिवसातून 5-6 वेळा लहान लहान तुकड्यांमध्ये जेवण घ्या.

नियमित व्यायाम :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

तुमच्या आवडीचा व्यायाम –
तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही शारीरिक हालचालींचा समावेश करा.
दररोज 30 मिनिटे-
दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा.
योगाभ्यास किंवा ध्यान-
मेंदूच्या आरोग्यासाठी योग किंवा ध्यानाचा सराव करा.

भरपूर झोप घ्या :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

7-8 तासांची झोप-
दररोज 7-8 तासांची झोप घ्या .
नियमित झोपण्याची वेळ –
ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.
शांत वातावरण-
झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा.

ताणांचे व्यवस्थापन :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

ध्यान आणि योग –
तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा.
छंद-
आपल्या छंदासाठी वेळ काढा.
मित्र आणि कुटुंबासोबत वेळ –
तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवा.

नियमित आरोग्य तपासणी :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

वार्षिक आरोग्य तपासणी-
वर्षातून एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करा.
दंत आरोग्य तपासणी-
दर 6 महिन्यांनी दातांची तपासणी करा.

दिनचर्या सुधारा :

New Year's Resolution: Make this resolution in the New Year for better health

डिजिटल डिटॉक्स-
झोपण्यापूर्वी मोबाईल फोनचा वापर कमी करा.
हेल्दी ब्रेकफास्ट-
न्याहारी करणे कधीही टाळू नका .
रोज चाला –
दररोज काही वेळ चालल्याने आरोग्याचे अनेक फायदे मिळतात.
आरोग्यदायी पदार्थ बनवा-
हेल्दी डिश घरीच बनवा.
सूर्यप्रकाश मिळवा-
दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात बसा.

हे संकल्प पूर्ण करण्यासाठी काही टिप्स :

छोटी उद्दिष्टे-
मोठ्या उद्दिष्टांची छोट्या छोट्या उद्दिष्टांमध्ये विभागणी करा आणि मग ती साध्य करण्याचा प्रयत्न करा.
सकारात्मक विचार –
सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
पाठिंबा-
मित्र आणि कुटुंबीयांचा पाठिंबा घ्या. यासाठी सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागा.
बक्षीस –
लहान लहान यशांसाठी स्वतःला बक्षीस द्या.

हेही वाचा : New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट बीच डेस्टिनेशन्स


Edited By – Tanvi Gundaye

Manini