आपण जे काही अन्न खातो. त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतो. खाल्लेला पदार्थ पचवण्यासाठी आपल्या तोंडातील अवयव महत्त्वाची भूमिका बजावतात. जीभ, दात, हिरड्या, लाळग्रंथी हे सर्व अवयव पचनासाठी आवश्यक ती कामं करतात. या अवयवांचे आरोग्य सांभाळणे म्हणजेच ओरल हेल्थ सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. आजही अनेक लोक दात आणि हिरड्या यांची योग्य काळजी घेत नाहीत, निष्काळजीपणा करतात ज्यामुळे अनेक तोंडाच्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. ओरल हेल्थच्या वाईट सवयींमुळे केवळ दात आणि हिरड्यांनाच त्रास होतो असे नाही तर शरीराचे वेगवेगळे आजारही होऊ शकतात. जाणून घेऊयात अशा आजारांविषयी जे आजार ओरल हेल्थवर अवलंबून असतात.
कार्डियोव्हॅस्क्युलर हेल्थला धोका :
वाईट ओरल हेल्थ आणि कार्डियोव्हॅस्क्युलर हेल्थ यांच्यातही परस्परसंबंध असतो. हिरड्या आणि तोंडात असलेले विषारी बॅक्टेरिया रक्तात मिसळतात आणि रक्तवाहिन्यांमधील सूज वाढवतात. ज्यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलर आजाराचा धोका वाढतो. यासाठी दात आणि हिरड्यांची योग्य स्वच्छता करणे गरजेचे आहे.
इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या :
हिरड्या आणि दातांची योग्य ती काळजी न घेतल्यास इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. तोंडातील बॅक्टेरिया जेव्हा रक्तात पसरू लागतात तेव्हा केवळ हृदयाच्याच नव्हे तर इतरही समस्या निर्माण होऊ शकतात. दातात तयार होणाऱ्या बॅक्टेरियामुळे क्रॉनिक पेरीडॉन्टल डिसीज होण्याची शक्यता असते. ज्यात हिरड्या दातांपासून दूर होतात आणि त्यांच्यात एक पोकळी निर्माण होते. या गॅपमध्ये अडकलेल्या अन्नामुळे बॅक्टेरिया तयार होतात. व हे बॅक्टेरिया रक्तवाहिन्यांमध्ये मिसळून सूज निर्माण करतात. रक्तवाहिन्यांमध्ये आलेली सूज इरेक्शनची समस्या निर्माण करते.
कॅन्सरचा धोका :
तंबाखू आणि स्मोकिंगमुळे दातातील घाण व दुर्गंधी वाढते. या वाढत्या घाणीमुळे बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढतो. पेरियोडोंटाइटिस असलेल्या रुग्णांमध्ये कॅन्सरचा धोका 24 टक्के जास्त पहायला मिळतो. विशेषत: स्वादुपिंडाच्या कॅन्सरची शक्यता अधिक असते.
डायबिटीसची समस्या :
हिरड्यांचा आजार केवळ डायबिटीसची समस्या निर्माण करत नाही तर ज्या व्यक्तींना डायबिटीस असतो त्यांना हिरड्यांचा आजार होण्याचा धोका अधिक असतो. हिरड्यांच्या आजारांमुळे सूजही निर्माण होते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते.
वाईट ओरल हेल्थ फुप्फुसांमध्ये इंफेक्शनची समस्या निर्माण करते.
हिरड्यांच्या सूजेमुळे 10 टक्के किडनी फंक्शन कमी होते.
Edited By – Tanvi Gundaye