Saturday, January 11, 2025
HomeमानिनीFashionSaree Fashion Trends : 2025 मध्ये असणार या साड्यांचा ट्रेंड

Saree Fashion Trends : 2025 मध्ये असणार या साड्यांचा ट्रेंड

Subscribe

2024 मध्ये फॅशन जगतात साडींनी आपली पकड कायम ठेवली आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये साडी नक्कीच लोकांची पहिली पसंती ठरेल अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक प्रकारच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हालाही तुमच्या कलेक्शनमध्ये या साड्यांचा समावेश करायचा असेल, तर त्यावर एक नजर टाकूया.

ऑर्गेन्झा साडी विथ हेवी एम्ब्रॉयडरी :

Orgenza saree with heavy embroidery (Image Source : Social media)

ऑर्गेन्झा हे अशाप्रकारचे फॅब्रिक आहे जे रेशीम धाग्यांनीबनवले जाते. तसेच, कधीकधी नायलॉन आणि पॉलिस्टरचे मिश्रण करून हे बनवले जाते. सुंदर दिसण्याव्यतिरिक्त, ऑर्गेन्झा साडी खूप मऊ असते आणि त्यावर मोठी फ्लोरल प्रिंटही असते. ऑर्गेन्झा साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हलकी असते. त्यामुळे पार्ट्या, लग्नसमारंभ आणि सण-समारंभातही ती महिलांची खास पसंती बनते. ऑर्गेन्झा साडीची खासियत ही आहे की ती साध्या पद्धतीने परिधान करूनही खूप अॅट्रेक्टिव्ह लूक देते. या साडीमध्ये तुम्हाला प्लेन बॉडी मिनिमलिस्टिक डिझाइनचे चांगले फ्यूजन पाहायला मिळते. या प्रकारची ऑर्गेन्झा साडी तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंटेड ब्लाउजसह घालू शकता. याशिवाय, तुम्ही स्वतःसाठी प्रीटेंड ऑर्गेन्झा साडी देखील निवडू शकता. या वर्षी अनेक अभिनेत्रींनी प्रीटेंड ऑर्गेन्झा साड्या नेसल्या आहेत. या प्रकारच्या साड्या पूजेच्या वेळी घालणे उत्तम! .फ्लॉवर प्रिंट, लीफ प्रिंट, ट्रॅडिशनल प्रिंट ऑर्गेन्झा साडी या प्रकारची प्रीटेंड ऑर्गेन्झा साडी देखील तुम्ही ट्राय करू शकता. या प्रकारच्या ऑर्गेन्झा साडीसोबत तुम्ही प्लेन ब्लाउज कॅरी करू शकता. तुम्ही लग्नासाठी किंवा कोणत्याही विशेष समारंभासाठी भरतकाम केलेली ऑर्गेन्झा साडी देखील नेसू शकता किंवा तुम्ही लखनवी चिकनकारी भरतकाम केलेली साडीही नेसू शकता.

- Advertisement -

भारतीय परंपरा जपणारी बनारसी साडी :

Saree Fashion Trends: The trend of these sarees will be in 2025
Banarasi saree (Image Source : Social media)

बनारसी साडी ही भारतीय परंपरेत समाविष्ट असलेली सर्वात खास साडी आहे, यामुळेच बनारसी साड्यांची फॅशन कधीच जुन्या होत नाही, जरी वर्क असलेल्या बनारसी साडीसह प्लेन ब्लाउजची स्टाइल फॅशन जगतात बेस्ट मानली जाते. तुम्ही फुल स्लीव्हज आणि फुल नेकलाइन ब्लाउज असलेली साडी नेसू शकता आणि बेल्ट घालून तिला आधुनिक टच देऊ शकता. टिश्यू बनारसी साडीसोबत ब्लॅक स्लीव्हज ब्रॅलेट डिझाइनचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो. जरी वर्क असलेला सीक्वेन्स ब्लाउज तुमच्या टिश्यू बनारसी साडीसोबत चांगला पर्याय ठरू शकतो. पफ स्लीव्हज ब्लाउजसोबतही तुम्ही बनारसी साडी ट्राय करू शकता. यंदाही याची खूप क्रेझ होती. कारण पफ स्लीव्ह ब्लाउज विंटेज आणि ग्रेसफुल लूक देतो. गेल्या दोन वर्षांत बनारसी साडीचा व्यवसाय खूप वाढला आहे . तसेच लग्नसराईच्या काळात बनारसी साड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही या साड्यांचा ट्रेंड कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो.

शिफॉन साडीमध्ये चिकनचा ट्रेंड :

Saree Fashion Trends: The trend of these sarees will be in 2025
Shiffon saree with chikankari work (Image source : Social media)

शिफॉन साडीचे फॅब्रिक अतिशय सुरेख असते. या प्रकारची साडी तयार करण्यासाठी तीन ते चार कारागीर लागतात. विशेष म्हणजे शिफॉनच्या साड्यांमध्ये चिकनचा ट्रेंड महिलांचा खूप आवडता ट्रेंड राहिला आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक महिलांनी चिकन साडीला पसंती दिली आहे. त्यांची किंमत देखील जास्त नाही. एक हजार रुपयांच्या आत तुम्हाला सुंदर शिफॉन साडी मिळू शकते. सणासुदीच्या काळातही शिफॉन साड्यांचा दबदबा कायम राहिलेला पाहायला मिळतो. पूजेदरम्यान हा एक परिपूर्ण पोशाख मानला जातो. याशिवाय मॅजेन्टा कलरच्या शिफॉन साडीलाही खूप पसंती मिळताना दिसते. अशा गडद रंगाच्या साड्यांसोबत फ्लॉवर एम्ब्रॉयडरी केलेले ब्रॅलेट स्टाइलचे ब्लाउज जास्त सुंदर दिसू शकतात .

- Advertisement -

रंगकट साडी :

Saree Fashion Trends: The trend of these sarees will be in 2025
Rangkat saree (Image source : Social media)

रंगकट साडी बनवायला खूप वेळ लागतो. याला तुम्ही विद्या बालनची साडीही म्हणू शकता. विद्या बालन अनेकदा रंगकट साडीत दिसते. यंदा या प्रकारच्या साडीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरीसह रंगकट साडी घालू शकता. त्यावर तुम्ही सोनेरी रंगाचा ब्लाउजही स्टाईल करू शकता. मात्र, रंगकट साडीची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही साडी कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही खरेदी करू शकता. रंगकट साडी ही एक प्रकारची बनारसी साडी आहे. रंगकट म्हणजे रंगीत ताना. यामध्ये कापडावर धागे वेगवेगळ्या रंगात रंगवले जातात. त्याचे धागे सामान्यतः साधे किंवा जरीचे असतात. रंगकट साडीचे सौंदर्य हे तिच्या नाजूक डिझाइनमध्ये आहे, जे तिला सर्वात खास बनवते. या साडीला स्टाइल करण्यासाठी तुम्ही ठळक रंग निवडू शकता. तुम्ही तुमच्या साडीनुसार कॉन्ट्रास्टिंग ब्लाउजही निवडू शकता.

सिल्क साडी :

Saree Fashion Trends: The trend of these sarees will be in 2025
Silk saree (lmage source : social media)

सिल्क साड्या त्यांच्या श्रीमंत, रॉयल आणि क्लासी लूकसाठी ओळखल्या जातात. तुम्हाला सिल्क साड्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतील. 2024 साली सिल्क साड्यांना खूप पसंती मिळाली. यावेळी टिश्यू सिल्क साड्यांचा ट्रेंड चांगलाच गाजला. कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनसाठी या साड्या सर्वोत्तम मानल्या जातात. यामध्ये पेस्टल शेडला महिलांची विशेष पसंती असते. याशिवाय पटोला सिल्कही ट्रेंडमध्ये आहे. पटोला साडीला श्रीमंतांची साडी म्हणतात. ही साडी खूप सुंदर दिसते. साध्या हाफ स्लीव्ह किंवा फुल स्लीव्ह ब्लाउजसोबत सिल्क साडी तुम्ही स्टाइल करू शकता.

हे ब्लाऊजही ट्रेंडमध्ये : 

Saree Fashion Trends: The trend of these sarees will be in 2025
Trendy blouse designs (Image source : Social media)

सिल्कच्या साड्या आणि भारी बनारसी साड्यांसाठी कट स्लीव्ह ब्लाउज मुख्यत्वे परिधान केले जातात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते डिझाइन करून घेऊ शकता. नेकलाइन गोल किंवा चौरस डिझाइनसह बनवता येते. तुम्ही ब्लाउजमध्ये लटकन किंवा कापडाची स्ट्रिंग डिझाइन करू शकता किंवा तुम्ही स्टोन वर्क आणि मोत्यांची स्ट्रिंग देखील बनवू शकता. या डिझाइनद्वारे तुम्ही तुमचा संपूर्ण लूक आकर्षक करू शकता. दुसरीकडे, तुम्ही पफ स्लीव्ह ब्लाउज सिल्क किंवा जॉर्जेट साड्यांसोबत स्टाइल करू शकता. प्रीटेंडसह नेटेड ब्लाउज पीससह पफ डिझाइन केलेले ब्लाउज बनवून तेही वापरू शकता. या प्रकारच्या ब्लाउजसह तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी स्टाइल करू शकता हे विशेष. याचप्रमाणे सध्या ब्रॅलेट ब्लाउज खूप ट्रेंडमध्ये आहे, तुम्ही ते फुल कव्हर ब्रॅलेट, स्टेपललेस ब्रॅलेट, प्लीटेड ब्रॅलेट आणि स्ट्रॅप ब्रॅलेटसह स्टाइल करू शकता.

हेही वाचा :  Fashion Tips : स्टायलिश आणि परफेक्ट लूकसाठी स्ट्रेटफिट जीन्स


Edited By – Tanvi Gundaye

 

- Advertisment -

Manini