हल्ली डेस्टिनेशन वेडिंगला तरुणाईची विशेष पसंती मिळत आहे. परंतु डेस्टिनेशन वेडिंग नेमकं कुठे करावं याबाबत अनेक प्रश्न तरुणांच्या मनात असतात. आज आपण जाणून घेऊयात अशा काही जागांविषयी ज्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी बेस्ट जागा आहेत.
कुर्गच्या शांत डोंगररांगांमध्ये वसलेलं अयातना कुर्ग ही एक सुंदर जागा आहे. इथे शांतीसोबतच तुम्हाला जंगल स्पा, इन्फिनिटी पूल आणि प्रायव्हेट झरा. सोबतच ग्लास हाउस डायनिंग हेदेखील एक असं फीचर आहे. जे या जागेला तुमच्या लग्नासाठी परफेक्ट बनवते. लग्नसोहळ्यांसाठी आणि बॅचलरेट पार्टीसाठी ग्लास हाऊस रेस्टॉरंट जरुर ट्राय करा.
वोको जिम कॉर्बेट मध्ये तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य असलेली एक शांत जागा मिळेल. इथे नदी किनाऱ्यांवर रोमँटिक डिनर, बार्बेक्यू आणि स्पा यांचा आनंद घेतला जाऊ शकतो. कोसी नदीजवळ आणि कॉर्बेट नॅशनल पार्कच्या जंगलाजवळ असणारे हे वेडिंग डेस्टिनेशन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
इंटरक़ॉन्टिनेंटल जयपूरमध्ये 51000 चौरस फूट बँक्वेट जागा आणि सुंदर गार्डनच्या मध्ये शाही लग्नाचा प्लॅन केला जाऊ शकतो. सोबतच रॉयल रूट डायनिंग लग्न अधिकच खास बनवू शकतील.
समुद्रकिनारी लग्नाचे प्लॅनिंग जर तुम्ही करत असाल तर इंटरक़ॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. इथे अरबी समुद्राचा एक सुंदर देखावा तुम्हाला पहायला मिळू शकतो. या वेडिंग पॉइंटवर बॉलरूममध्ये लग्न करणं हे काही स्वप्नापेक्षाही कमी नाही. तुम्ही यानंतर रुफटॉपवर सनसेटची मजाही घेऊ शकता.
गोव्याचे सौंदर्य कोणाला भुरळ पाडत नाही? जर तुम्हाला गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचे असेल तर तुम्ही हॉलिडे इन रिसॉर्ट गोवा येथील मोबोर बीचवर जाऊ शकता. लाटांच्या मध्ये लग्नासाठी ही एक कमाल जागा आहे. परफेक्ट बीचसाइड डायनिंग आणि स्पा यांचा आनंदही तुम्ही याठिकाणी घेऊ शकता.
केरळच्या बॅकवॉटर किनाऱ्यावर क्राउन प्लाजा कोची आहे. तुमच्या लग्नसमारंभाकरता क्रूज बोट, बॅकवॉटरचे सौंदर्य या सर्व गोष्टींमुळे चार चांद लागतील.
हेही वाचा : Fashion Tips : सलवार-सूटसह हे स्टायलिश ऑक्सिडाईज्ड झुमके करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye