हिवाळा येताच उन्हाळ्याचे सर्व कपडे पेटीत बांधून ठेवले जातात. या ऋतूमध्ये एखाद्या खास प्रसंगी आपल्याला एथनिक लूक करायचा असेल तर फॅशनेबल दिसता यावं यासाठी वुलन कपडे न घालता एथनिक लूक स्टाईल केला जातो. परंतु हे आपण नेहमी करू शकत नाही. अशात आपण आपल्या वुलन कपड्यांनाच एथनिक आणि स्टायलिश लूक देऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या दुपट्ट्यांचा वापर केला जाऊ शकतो.
फुलकारी वर्क दुपट्टा :
पंजाबी एम्ब्रॉयडरी असलेला फुलकारी दुपट्टा हा दुपट्टा विश्वात आपल्या निराळ्या रंगांमुळे आणि् बोल्डकढाईमुळे लोकप्रिय आहे. तुम्हाला बाजारात याप्रकारची एम्ब्रॉयडरी असलेले अनेक दुपट्टे मिळतील. या दुपट्ट्यांची खासियत अशी की तुम्ही सिंपल सूटसोबत देखील हे दुपट्टे घेऊ शकता. यासाठी तुम्हाला उन्हाळा किंवा हिवाळा कोणत्याही सीझनची वाट पहावी लागत नाही. तुम्ही हा दुपट्टा वुलन सूटसोबतही घेऊ शकता. हे तु्मच्या प्रत्येक सूटला ग्रेसफुल लूक देऊ शकतील.या दुपट्ट्यांमुळे तुम्हाला एथनिक लूक मिळू शकतो.
सिल्कचा दुपट्टा :
सिल्क प्रकारची खासियत अशी की याची प्रकृती उष्ण असते. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे सिल्क दुपट्टे मिळू शकतात. तुम्ही यांना क़ॉटसूल फॅब्रिकच्या कुर्त्यांसोबत कॅरी करू शकता. तुम्ही याला कोणत्याही अंदाजात ड्रेप करू शकता. तुम्हाला या दुपट्ट्याच्या फॅब्रिकमध्ये अनेक व्हरायटीही मिळू शकतील. तुम्ही हिवाळ्यासाठी थोडा हेवी दुपट्टाही घेऊ शकता.
वेलवेट फॅब्रिकचा दुपट्टा :
वेलवेट फॅब्रिकमध्ये तर तुम्हाला संपूर्ण सेट उपलब्ध होऊ शकतो. आणि जर तुम्ही एखाद्या वुलन सूटसोबत वेलवेट दुपट्टा घेऊ इच्छित असाल तर यात तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही प्लेन सूटवर या प्रकारचा दुपट्टा घेऊ इच्छित असाल तर तुम्ही याला शालप्रमाणे पांघरू शकता.
खादीच्या कपड्याचा दुपट्टा :
उन्हाळ्यात खादी शरीराला थंडावा देते तर हिवाळ्यात उबदारपणा. बाजारात तुम्हाला खादीचे केवळ सूटच मिळत नाहीत तर त्याच्या दुपट्ट्यांमध्येही अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात. खादीमध्ये तुम्हाला खूप हेवी आणि डिझाईन असणारे दुपट्टे मिळणार नाहीत त्यामुळे या प्रकारचे दुपट्टे तुम्ही ऑफिसला जाण्यासाठीही वापरु शकता.
हेवी कॉटन दुपट्टा :
हेवी कॉटन दुपट्टाही तुम्ही हिवाळ्यात कॅरी करू शकता. तुम्हाला या अशाप्रकारचे दुपट्टे उबदारपणासोबतच स्टायलिश लूकदेखील देऊ शकतील. याप्रकारच्या दुपट्ट्यांना तुम्ही गळ्यातदेखील स्कार्फप्रमाणे गुंडाळू शकता. जर तुमच्याकडे राजस्थानी मिरर वर्क असलेला दुपट्टा असेल तर तो तुम्ही ओपन फॉल स्टाईलमध्येही कॅरी करू शकता.
हेही वाचा : Oily Skin Care : ऑईली स्किनसाठी अजिबात वापरू नयेत हे प्रॉडक्ट्स
Edited By – Tanvi Gundaye