Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : खांद्याचे दुखणे असू शकते ब्रेस्ट कॅन्सरचा संकेत ?

Health Tips : खांद्याचे दुखणे असू शकते ब्रेस्ट कॅन्सरचा संकेत ?

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारात भरपूर प्रमाणात वाढ झालेली दिसतेय. हा जगभरातील महिलांना होणारा मोठ्या प्रमाणात होणारा कॅन्सर आहे. भारतात याचा धोका वाढत चालला आहे. काही वेळेला तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका इतका वाढतो की त्यावर इलाज करणेही कठीण होऊन बसते. यासाठीच याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर फक्त छातीत बदल होतात जसे की छातीत गाठ येणे किंवा दुखणे पण तुम्हाला माहित आहे का ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर खांद्यामध्येही वेदना निर्माण होऊ शकतात.

एक्सपर्टसच्या म्हणण्यानुसार, खांद्याचं दुखणं हे ब्रेस्ट कॅन्सरचा संकेत असू शकते. लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत. कारण खांद्याचं दुखणं हे इतर सामान्य दुखण्याप्रमाणेच असल्याने त्याला नजरअंदाज केलं जातं. परंतु काही वेळा हीच खांदेदुखी ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. एक्सपर्टस सांगतात की आपले स्तन हे आपल्या आर्मपिटपर्यंत म्हणजेच खांद्यापर्यंत जातात. आपल्याला असं वाटतं की आपल्या स्तनाच्या ज्या पेशी आहेत. त्या केवळ पुढील बाजूस आहेत. परंतु असे नाही हा संपूर्ण अवयव खांद्यापर्यंत पसरलेला असतो. काहीजणांच्या पाठच्या बाजून कॅन्सर असू शकतो ज्यामुळे त्यांच्या खांद्यात दुखू शकतं.

याशिवाय खांद्याचं दुखणं मेटास्टेसिसचंही लक्षण असू शकतं. असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा स्तनाच्या पेशी स्तन सोडून शरीराच्या इतर ठिकाणी पसरत जातात. यामुळे हाडं कमजोर होतात. आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. मेटास्टेसिस कॅन्सरमुळे खांद्यामध्ये होणाऱ्या वेदना या व्यायाम केल्यावर होणाऱ्या वेदनेसारख्या असतात.

 

 

 

Manini