Thursday, January 9, 2025
HomeमानिनीNew Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट बीच डेस्टिनेशन्स

New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट बीच डेस्टिनेशन्स

Subscribe

2024 हे वर्ष आता संपत आले आहे. सर्वांना नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. सर्वजण आता 2025 या वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी आता अनेकांची प्लॅनिंग करण्यालाही सुरुवात झाली आहे. न्यू इयर पार्टीच्या सेलिब्रेशनसाठी गोवा हे एक सुप्रसिद्ध डेस्टिनेशन समजले जाते. इथल्या बीचवर लोक खूपच एन्जॉय करताना दिसतात. ही जागा नाईट लाइफ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी परफेक्ट समजली जाते. अनेकांनी इथे नवीन वर्ष साजरे करण्याची प्लॅनिंगदेखील केली आहे.

जर तुम्हाला नवीन वर्षाच्या दिवशी बीचवर पार्टी करायची असेल तर आज जाणून घेऊयात भारतातील काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल जिथे तुम्ही नवीन वर्ष साजरे करू शकता. तुम्ही येथे कुटुंब, मित्र, जोडपे अगदी कोणाहीसोबत जाऊ शकता.

- Advertisement -

गोकर्ण, कर्नाटक :

New Year Celebration : Perfect Beach Destinations for New Year Celebration
Gokarna beach , Karnataka.(Image Source : Social Media)

जर आपण गोव्याचा पर्याय पाहिला तर कर्नाटकातील गोकर्ण हे एक परिपूर्ण ठिकाण आहे . हे ठिकाण शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही ओम बीच, कुदले बीच आणि हाफ मून बीचवर नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. येथील सौंदर्य नवीन वर्ष अधिक संस्मरणीय बनवेल. येथे तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी एक चांगले दृश्य देखील मिळेल. तुम्ही येथे सेल्फी, ग्रुप फोटो घेऊ शकता.

राधानगर बीच, अंदमान :

New Year Celebration : Perfect Beach Destinations for New Year Celebration
Radhanagar Beach, Andaman (Image Source : Social Media)

अंदमानचे राधानगर बीच हे आशियातील सर्वात मोठे समजले जाते. नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी येथील पांढरे वाळवंट, स्वच्छ पाणी आणि हिरवळ योग्य आहे. इथे गर्दी खूप कमी दिसेल. नवीन वर्षात तुम्ही येथे अनेक जलक्रीडेचा आनंद घेऊ शकता.

- Advertisement -

कन्याकुमारी बीच, तामिळनाडू :

New Year Celebration : Perfect Beach Destinations for New Year Celebration
Kanyakumari beach, Tamilnadu.(Image Source : Social Media)

कन्याकुमारी बीचवर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात. नवीन वर्षात तुम्ही येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहू शकता. दरवर्षी येथे नववर्ष साजरे करण्यासाठी लोकांची गर्दी असते. हे ठिकाण इतके सुंदर आहे की तुम्ही इथल्या दऱ्याखोऱ्यात हरवून जाल.

मांडवी बीच, गुजरात:

New Year Celebration : Perfect Beach Destinations for New Year Celebration
Mandavi Beach, Gujrat (Image Source : Social Media)

शांतता आणि निवांतपणा हवा असेल तर सर्वांसाठी गुजरातचा मांडवी बीच हे योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही उंट सवारीचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचे सुंदर दृश्य इथे बघायला मिळते. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.

चेराई बीच, केरळ:

New Year Celebration : Perfect Beach Destinations for New Year Celebration
Cherai Beach, Kearla (Image Source : Social Media)

केरळच्या चेराई बीचला पर्यटकांची पहिली पसंती आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी निसर्गप्रेमी येथे जाऊ शकतात. इथे समुद्राच्या लाटा तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. तुम्ही गोव्यापासून दूर एखादे वेगळे ठिकाण शोधत असाल तर हा बीच सर्वोत्तम असेल.

हेही वाचा : Parenting Tips : या टिप्सनी मुलांना लावा संस्कारांचे वळण


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini