‘थँक्सगिव्हिंग डे’ हा एक पारंपरिक उत्सव आहे जो यावर्षी 28 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरूवारी साजरा केला जातो. थँक्सगिव्हिंग हा एकप्रकारे कापणीचा उत्सव आहे. ज्याची सुरुवात 1621 मध्ये झाली होती. हा दिवस कुटुंब आणि मित्रांसमवेत एकत्र वेळ घालवण्याचा, स्वादिष्ट भोजन करण्याचा आणि गेलेल्या वर्षाबद्दल आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जाणून घेऊयात थँक्सगिव्हिंग डे ची सुरुवात कशी झाली आणि हा कशासाठी साजरा केला जातो याबद्द्ल.
थँक्सगिव्हिंग डे चा इतिहास :
थँक्सगिव्हिंग उत्सवाची सुरूवात 1621 मध्ये प्लायमाउथ , मॅसाच्युसेटस मध्ये झाली होती. त्यावेळी इंग्लंडवरून आलेले प्रवासी प्रचंड थंडी आणि दुष्काळाचा सामना करत होते. स्थानिक अमेरिकावासी विशेषत: वॅम्पानोग जातीच्या लोकांनी त्यांना जेवण बनवण्याचे आणि शेती करण्याचे ध़़डे दिले. पहिल्या कापणीनंतर इंग्लंडवासियांनी वॅम्पागोनच्या लोकांसोबत तीन दिवसांचा उत्सव साजरा केला. ज्यात जेवण, खेळ आणि नाचगाणी यांचा समावेश होता. या उत्सवाला इतिहासातील पहिला ‘थँक्सगिव्हिंग डे’ समजले गेले.
परंतु , थँक्सगिव्हिंगला अमेरिकेचा नॅशनल हॉलिडेच्या रुपात मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. 1863 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी थँक्सगिव्हिंगला नॅशनल हॉलिडे म्हणून घोषित केले.
थँक्सगिव्हिंग डे चे महत्त्व :
थँक्सगिव्हिंग हा दिवस आपल्या कुटुंबियांप्रति आणि मित्रपरिवाराप्रति आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस जीवनात त्या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जसे की कुटुंब, मित्र , आवडत्या व्यक्ती इ.
थँक्सगिव्हिंग कुटुंबाला आणि मित्रांना एकत्र आणणारा दिवस आहे. हा एक असा दिवस आहे जेव्हा लोक एकत्र वेळ घालवतात, एकत्र जेवतात आणि गप्पा मारतात.
थँक्सगिव्हिंग आपल्याला इतरांची मदत करण्यासाठी आणि समाजात आपले योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणारा दिवस आहे. अनेक लोक यादिवशी गरजू लोकांना अन्नदान आणि कपडेदान करतात.
थँक्सगिव्हिंग डे ची परंपरा :
थँक्सगिव्हिंग डे शी जोडलेल्या अनेक परंपरा आहेत. ज्यापैकी काही म्हणजे –
टर्की खाणे –
टर्की हा थँक्सगिव्हिंग डे साठी खाल्ला जाणारा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. याला सामान्यत: स्टफिंग, मक्खन आणि ग्रेवीसोबत खाल्लं जातं.
परेड –
अनेक शहरांमध्ये थँक्सगिव्हिंग डे च्या दिवशी परेडचे आयोजन केले जाते. या परेडमध्ये फ्लोट , बँड आणि अन्य काही मनोरंजनाच्या गोष्टींचा समावेश असतो.
फुटबॉल पाहणे –
थँक्सगिव्हिंग डेला अमेरिकेचा फुटबॉल दिवसही साजरा केला जातो. काही लोक यादिवशी फुटबॉलच्या मॅचेस पाहतात.
थँक्यू लेटर लिहिणे –
काही लोक थँक्सगिव्हिंग डेला आपल्या परिवार आणि मित्रांना थँक्यू लेटर लिहितात.
हेही वाचा : Winter Fashion Tips : हिवाळ्यात हे स्लीव्हलेस स्वेटर करा ट्राय
Edited By – Tanvi Gundaye