घरलाईफस्टाईलम्हणून फरसबी नक्की खावी

म्हणून फरसबी नक्की खावी

Subscribe

अनेक लोक आपल्या ताटात वाढलेल्या फरसबीच्या भाजीकडे बघून नाक मुरडतात. खरे पाहता फरसबीच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. फरसबी खूप आरोग्यदायी आणि शक्तिवर्धक आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप लाभदायी असतात. या शेंगा नियमित आहारात वापरायची काही कारणे आहेत ती आपण पाहुयात.

green beans
फरसबी (फोटो सौजन्य- trupti’s kitchen)

१) हृदयरोगाचा धोका कमी होतो

- Advertisement -

फरसबीमध्ये फ्लेवोनॉइड्सचे प्रमाण खूप असते यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. फ्लेव्होनॉइड्स हे पॉलिफोनिक अँटिऑक्सिडेंट्स आहेत जे मुख्यत्वे करुन फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात. फ्लेव्होनॉइड्समुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याला प्रतिबंध करतात.

२) हाडांचे आरोग्य सुधारते

- Advertisement -

फरसबीमध्ये कॅल्शियम असते जे हाडांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. कॅल्शियम व्यतिरिक्त हिरव्या शेंगामध्ये व्हिटॅमिन के, ए आणि सिलिकॉन असतात. या सर्व व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे हाडांची झीज होते. त्यामुळे हे व्हिटॅमिन आपल्या हाडांच्या आरोग्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. आपली हाडे बळकट करायची असतील तर हिरव्या फरसबीच्या शेंगांचे सेवन करणे खूप आवश्यक आहे.

३)डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत

फरसबीमध्ये कॅरेटिनॉइड भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डोळ्यांच्या आतील शिरांवर येणारा ताण कमी करण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नक्कीच फरसबीचा आहारात नियमित वापर करा.

french beans
फरसबीची भाजी (फोटो सौजन्य- archana’s kitchen)

४) पचनाच्या समस्या सोडविण्यासाठी मदत

फरसबीमध्ये भरपूर तंतू म्हणजेच फायबर असतात. फायबरमुळे पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. शेंगातील फायबर मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात. तसेच शेंगातील फायबर शरीरातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यास मदत करतात.

५)शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

फरसबीच्या शेंगामध्ये मूत्र विसर्जनास मदत करणारा गुणधर्म असतो. त्यामुळे शरिरातील विषारी तसेच अनावश्यक घटकांना मूत्राद्वारे बाहेर काढण्यास मदत होते.

६) शरिरातील पेशी आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवते.

फरसबीच्या शेंगांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम शरिरात नवीन पेशींची निर्मिती करण्यास मदत करतात आणि शरिरातील पाण्याचे प्रमाण देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

green beans
फरसबीची भाजी (फोटो सौजन्य- trupti’s kitchen)

फरसबीचे अतिसेवन मात्र धोकादायक

फरसबीचे खूप सारे फायदे आहेत म्हणून त्याचे खूप जास्त प्रमाणात सेवन करणेदेखील योग्य नाही. कारण त्याचे अती सेवन मात्र तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. फरसबीमध्ये फॅटिक अॅसिड असतात, ज्यामुळे काही खनिजे, कॅल्शियम आणि झिंकचे शरिराद्वारे शोषण होत नाही. फरसबी शिजवून खाल्ल्यास मात्र त्याच्या दुष्परिणामाची तीव्रता कमी होते.
त्यामुळे फरसबी नेहमी शिजवूनच खावी, कच्ची फरसबी खाल्यास त्याचे शरिरावर काही प्रमाणात दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -