हिवाळ्यात बॉडी मसाज करणे अत्यंत गरजेचे असते. यामागचं कारण म्हणजे हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, त्वचा कोरडी किंवा रफ होऊ लागते. सांधे व स्नायूंमध्ये ताण जाणवतो. या मसाजमुळे शरीराला उब मिळते . नियमित मसाज केल्याने शरीराला आवश्यक उष्णता मिळते, रक्ताभिसरण सुधारते. आज आपण हिवाळ्यात बॉडी मसाज करण्याचे काही जबरदस्त फायदे जाणून घेऊयात.
रक्ताभिसरण सुधारते
थंड हवामानामुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होते. बॉडी मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.
सांधेदुखी आणि स्नायूदुखी कमी होते
हिवाळ्यात सांधे आणि स्नायूंमध्ये ताण जाणवतो. मसाजमुळे स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होतात.
त्वचेला पोषण मिळते
थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते. मसाजसाठी वापरलेले तेल जसे की नारळाचे तेल, बदाम तेल, तिळाचे तेल या तेलामुळे त्वचेला पोषण मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते त्यामुळे आपण सहजपणे आजरी पडतो. बॉडी मसाज केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.
मानसिक ताण कमी होतो
या मसाजमुळे आपल्याला विश्रांती मिळते.मानसिक ताण देखील कमी होतो.
त्वचेची चमक वाढते
हिवाळ्यात मसाज केल्यास त्वचेला नॅचरल ग्लो मिळतो आणि मृत पेशी बाहेर टाकण्यास देखील मदत मिळते.
मसाजसाठी हे तेल फायदेशीर
- नारळ तेल – कोरडेपणासाठी
- बदाम तेल – त्वचेला पोषण देण्यासाठी
- तिळाचे तेल – सांधेदुखीसाठी
- ऑलिव्ह तेल – कोमल त्वचेसाठी
हिवाळ्यात नियमित बॉडी मसाज केल्यास शरीर चांगले आणि निरोगी राहते.
हेही वाचा : Health Tips : शुगरचं सेवन केल्याने एंग्झायटी ट्रिगर होते का ?
Edited By : Prachi Manjrekar