‘An Apple a Day Keeps the Doctor Away’ सफरचंदांबद्दल ही म्हण खूप जुनी आहे आणि ती खरीही आहे. आमच्या घरातील वडील नेहमी सांगतात की रोज एक सफरचंद खा. यामुळे तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. तर सफरचंद खाल्ल्याने आरोग्याच्या कोणत्या समस्यांपासून तुम्ही लांब राहू शकता जाणून घेऊयात.
- फायबरने समृद्ध असलेला सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.
- सफरचंद खाल्ल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारली तर तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. सफरचंद खाणारे व्यक्ती लवकर आजारी पडत नाहीत.
- तुम्ही जर दररोज एक सफरचंद खालले तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी होऊन जाते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 18% टक्क्यांनी कमी होतो.
- सफरचंदांमध्ये अँटिऑक्सिडेंट पॉलीफेनॉल असतात. त्यामुळे फुफ्फुस, स्तन आणि पचनसंस्थेच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगांवर सफरचंद फायदेशीर आहे. तसेच कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
- सफरचंद रोज खाल्ल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. सफरचंदात अँटिऑक्सिडंटची उपस्थिती हे याचे मुख्य कारण मानले जाते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि मेंदू लवकर म्हातारा होत नाही, म्हणजेच त्याचे कार्य चांगले राहते.
या गोष्टी लक्षात ठेवा :
- सफरचंदाच्या सेवनापूर्वी ते स्वच्छ धुऊन घ्या, जेणेकरून त्याच्यावर असणारे मेण किंवा कीटकनाशके निघून जातील.
- सफरचंदाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला खराब होण्यापासून रोखण्यासाठी सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- सफरचंदाला आपल्या आहाराचा नियमित भाग बनवा. तसेच या टिप्सचे पालन करून फळाच्या पौष्टिक गोष्टींचा पूर्णपणे उपयोग करा.
- सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा, आंबट फळे, लोणचे खाणे नेहमी टाळावे.
- आजकाल अशी सफरचंदही बाजारात उपलब्ध आहेत ज्यात रसायनांचा वापर केला जातो, हे थोडे स्वस्त आहेत. पण आपण त्यांचे सेवन टाळले पाहिजे.