मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. मित्र तेच असतात ज्यांना तुम्ही तुमच्या मनातील सर्वकाही अगदी बिंनधास्तपणे सांगता. असे म्हटले जाते की, तुमची मैत्री 7 वर्षांपेक्षा जुनी असेल तर ती खास आणि आयुष्यभराची मैत्री असते. पण, सर्वांच्याच बाबतीत असे घडते असे नाही. नाते कोणतेही असो तुटण्यासाठी काही मिनिटेच पुरेशी असतात. कधी एखाद्या गोष्टीवरून नाराजी, कधी विचार न पटणे, मतभेद तर कधी पैशाचे व्यवहारही मैत्री तुटण्याचे कारण बनतात. त्यामुळे मैत्री शत्रू होण्यामागची कारणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कारण या कारणांपासून दूर राहणे सोपे होते आणि मैत्री मजबूत होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात, अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मैत्रीच्या नात्यात गैरसमज निर्माण करतात आणि मैत्री तुटते.
- मैत्रीतील सर्वात पहिला नियम असतो की, मित्राच्या मागे त्याच्या बद्दलच वाईट बोलणे. जर तुम्हाला मित्राची एखादी सवय आवडत नसेल तर त्याला समोर समजावून सांगावी. त्याच्या मागे बोलण्याची सवय तुम्ही सोडायला हवी. तुमच्या या सवयीमुळे मित्राला वाईट वाटू शकते आणि त्याचा तुमच्या मैत्रीवर परिणाम होऊ शकतो.
- ऑफिस, कॉलेज किंवा घराच्या आसपास तुमचा एखादा मित्र आहे. मात्र त्याच्याशी तुम्ही खोटेपणाने वागत असाल तर तसे करु नका. जेव्हा त्या मित्राला तुमच्या खऱ्या स्वभावाबद्दल कळेल तेव्हा तो तुमच्यापासून दूरावला जाईल. केवळ मैत्रीतच नाही तर एकदंरच आयुष्यात खोटे बोलू नये.
- मित्रमैत्रणींमध्ये एकमेकांची मस्करी केली जाते. मात्र कधीकधी मस्करी ऐवढी केली जाते की, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाईल. मस्करी करताना पर्सनल कमेंट्स करणे सुद्धा चुकीचे आहे. तुमच्या या सवयीमुळे मित्र तुमच्यापासून दूर होऊ शकतात.
- मैत्री हे एक नाते आहे जे पूर्णपणे परस्पर असते, म्हणजेच तुम्ही जेवढे घ्याल तेवढे देणे ही बाब आहे. इथे पैसा नाही तर भावनिक आधार असतो.
- मैत्रीच्या नात्यात संवाद खुला असावा, तेही दोन्हींकडून असावा. एका मित्राने आपले मत मांडले पण दुसऱ्याला आपले मत मांडण्यासाठी वातावरण मिळाले नाही तर मैत्री तुटण्याच्या मार्गावर येते.
- कोणी कितीही व्यस्त असला तरी तो नेहमी आपल्या प्रिय व्यक्तींसाठी वेळ काढतो. मैत्रीच्या नात्यातही असेच घडले पाहिजे. आपल्या मित्रासाठी वेळ काढणे हा देखील चांगल्या मैत्रीचा नियम आहे.
हेही पाहा –