घरलाईफस्टाईलआंघोळ न केल्याने होतात 'हे' फायदे

आंघोळ न केल्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात अंघोळ केल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होते. तर काही एक्सपर्ट असे सांगतात की हिवाळ्यात अंघोळ केल्याने शरीरासाठी हानिकारकही ठरु शकते.

आपल्या दिवसाची सरुवात होते ते म्हणजे सकाळच्या स्वच्छ आंघोळीने. दररोज आंघोळ केल्याने आपण फ्रेश राहतो. आता हिवाळ्याचा मोसम चालू आहे. हिवाळ्यात मात्र सकाळी उठून आंघोळ करण्याचा सर्वानांच कंटाळा येत असतो. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात अंघोळ केल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होते. तर काही एक्सपर्ट असे सांगतात की हिवाळ्यात अंघोळ केल्याने शरीरासाठी हानिकारकही ठरु शकते. पाहूयात हिवाळ्यात अंघोळ न केल्याने काय फायदे होतात.

अमेरिकेतील डॉक्टर ड्रर्मेटॉलॉजिस्टच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, त्वचेला स्वत:ला स्वच्छ ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही जर रोज अंघोळ केली नाही तरीही तुमची त्वचा स्वत:ला स्वच्छ करते. रोज अंघोळ केल्याने त्वचा कोरडी पडते असे तज्ज्ञ म्हणतात. त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी होते. त्वचेतील त्वचा सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत करते. त्यामुळे रोज किमान १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करु नये.

- Advertisement -

हाता पायांची नखे जास्त वेळ पाण्यात गेल्याने नखांचे नुकसान होते. आंघोळीच्या वेळी आपल्या नखांमध्ये पाणी जाते.त्यामुळे नखे मऊ होतात आणि तुटतात. हिवाळ्याच्या दिवसात रोज अंघोळ केल्याने प्रतिकारक शक्ती कमी होते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसातून एकाहून अधिक वेळा अंघोळ केल्यास आपली त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे दररोज आंघोळ केल्याने पाण्याचा अपव्यव होतो, असे तज्ज्ञ सांगतात.


हेही वाचा – चपात्या खाणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतो आरोग्यावर दुष्परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -