शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त भाज्यांचे सेवन करणं उत्तम मानलं जातं. भाज्यांमध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे आपल्या शरीराला मिनरल्स आणि व्हिटॅमिन मिळतात. अश्या अनेक भाज्या आहेत ज्या आपण न शिजवता देखील खाऊ शकतो. तसेच काही भाज्या देखील आहेत ज्यांना आपण कच्चे खाऊ शकत नाही. या भाज्यांना न शिजवता खाल्ल्यास शरीराला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे अशा भाज्यांचे सेवन कधीही करु नये
या भाज्यांचे कधीही कच्चे खाऊ नये
- वांगं
वांग्याची भाजी, वांग्याचे भरीत, भजी अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. मात्र, वांगं कधीही कच्चे खाऊ नये. वांग्यात अल्कलॉइड कंपाऊंड सोलानाइन नावाचे घटक आढळतात, जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. वांगी कच्ची खाल्ल्यास हा घटक शरीरात विरघळतो, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
- पालक
पालेभाज्यांमध्ये पालकच्या भाजीला अनेक पोषक घटकांनी समृद्ध मानले जाते. मात्र, पालक कधीही कच्चे खाऊ नये. यामुळे तुमच्या शरीराला नुकसान पोहचू शकते.
- बटाटा
बटाटा आणि बटाट्यापासून तयार केले जाणारे पदार्थ अनेकांना आवडतात. मात्र, बटाटा नेहमी शिजवून खावा. जर तो कच्चा खाल्यास पचना संबंधित समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा :