घरलाईफस्टाईलस्वतःवर प्रेम करण्यास मदत करतील 'या' ४ गोष्टी

स्वतःवर प्रेम करण्यास मदत करतील ‘या’ ४ गोष्टी

Subscribe

नवीन वर्षाची आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांनी नवनवीन संकल्प केले असतील. यंदा तुम्ही स्वतःवर प्रेम करण्याचा अनोखा संकल्प करू शकता. यासाठी स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? आणि ते कसे करतात ते आज जाणून घेऊयात. आपल्यापैकी अनेक जण स्वतःचा विचार हा कमी प्रमाणात करतात. विशेष करून स्त्रिया या स्वतःकडे दुर्लक्ष करतात. स्त्रिया या घर संसारामध्ये इतक्या मग्न होतात की स्वतःकडे लक्ष किंवा स्वतःवर प्रेम करायचे विसरून जातात.

स्वतःवर प्रेम करणे म्हणजे नेमकं काय?What Self-Love Truly Means and Ways to Cultivate It स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा विचार करणे. स्वतःच आदर करणे. स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणे. स्वतःची काळजी घेणे.

- Advertisement -

स्वतःवर प्रेम करण्यासाठी टिप्स-

1) स्वतःची स्पेशिअल क्वालिटी ओळखणे

- Advertisement -

स्त्रिया या अनेकदा स्वतःला कमी लेखतात. त्या काय करू शकतील आणि त्यांना काय येतं हे सुद्धा त्यांना कधी माहित नसते. अशाने त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता ही सक्षम बनत नाही. त्यामुळे स्वतःवर प्रेम करण्यास अजिबात संकोच करू नका. दुसऱ्यांशी तुलना करणे सोडून द्या. तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट केल्यास लोक काय म्हणतील हा विचार करणेही सोडून द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका.

2) मनभर आणि पोटभर खा

गृहिणी असो वा वर्किंग वूमन सकाळच्या गडबडीत अनेकदा त्या स्वतःच्या खाण्यापिण्याकडे तसं महत्व देत नाही किंवा घाईघाईत तरी खातात. अशाने काही स्त्रिया या मानसिक समस्यांमुळे अति प्रमाणात खायला सुरुवात करतात. ज्याला Binge eating असे म्हणतात. जे आरोग्यासाठी हानीकारक आहे. एक लक्षात ठेवा तुमच्या शरीराची काळजी ही तुम्हालाच घ्यायची आहे. जर तुमचे स्वास्थ चांगले असेल तर तुम्ही आनंदी राहाल.

3) स्वतःला माफ करा

अनेकदा एखादी घटना घडल्यास त्या घटनेसाठी आपण स्वतःला जबाबदार धरतो. त्यामुळे जे काही घडलं असेल तर त्यासाठी स्वतःला माफ करायला शिका. चुका प्रत्येकाकडूनच होतात त्यामुळे तुम्हीही स्वतःला माफ केलेच पहिजे. याने तुम्हाला स्ट्रेस आणि प्रेशर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

4) निगेटिव्ह लोकांपासून स्वतःला दूर ठेवा

अनेकदा निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने आपले विचारही निगेटिव्ह होतात. निगेटिव्ह विचारांमुळे आपण कोणताही निर्णय घेण्यास तेवढं सक्षम राहत नाही. त्यामुळे अशा लोकांनापासून लांब राहण्याचा प्रयन्त करा.

 


हेही वाचा;

किचन कॅबिनेट चिकट झालंय, मग असे करा स्वच्छ…

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -