आपल्या घरातील वातावरण सुखद आणि शांततेचे असावे, असे प्रत्येकालाच वाटते. परंतु कधीतरी लहान गोष्टींमुळे घरात वाद निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही विशिष्ट वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या 7 वस्तूंमुळे वास्तूदोष निर्माण होताे.
तुटलेल्या वस्तू
घरात तुटलेल्या भांड्या किंवा आरसे घड्याळे, शोपीस किंवा इतर वस्तू ठेवू नये. या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.
नकारात्मक चित्रे आणि शोपीस
नकारात्मक चित्रे किंवा काही शोपीस ठेवल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. युद्ध, दुःखद घटना, रडणारे लोक किंवा हिंसाचार दर्शवणारी चित्रे आणि शोपीस कुटुंबात अशांतता निर्माण करू शकतात.त्यामुळे शक्यतो घरात अशी चित्रे किंवा शोपीस ठेवू नका.
बंद घड्याळ
बिघडलेले किंवा बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नये . थांबलेले किंवा बंद घड्याळ वेळेच्या अडचणी आणि जीवनातील प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते. हे घरातील आर्थिक व मानसिक तणाव वाढवू शकते.
देवतेची अर्धवट किंवा तुटलेली मूर्ती
कोणत्याही देवतेची अर्धवट किंवा तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. देवघरात किंवा घरात कुठेही तुटलेल्या किंवा विद्रूप झालेल्या देवतांच्या मूर्ती ठेवल्यास वाद आणि अडथळे निर्माण होऊ शकतात.
कोरड्या फुलांची सजावट
घरात कोरडी फुले किंवा झाडलेल्या पाने ठेवल्याने घरात निराशा आणि वाद वाढतात.
घरात अनावश्यक कचरा आणि अस्वच्छता
घरात खूप जास्त अनावश्यक वस्तू, अडगळ, कचरा साचवून ठेवल्यास घरात तणाव आणि वाद वाढू शकतात.
तुटके दरवाजे आणि खिडक्या
घरातील दरवाजे आणि खिडक्यांचे कुलूप तुटलेले असेल किंवा त्याचा आवाज येत असेल, तर वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे कुटुंबातील संबंध बिघडू शकतात.
उपाय
- तुटलेल्या वस्तू आणि नकारात्मक गोष्टी त्वरित घरातून काढून टाका.
- घड्याळे चालू स्थितीत ठेवा.
- स्वच्छता आणि योग्य प्रकाशयोजना ठेवा.
- सकारात्मक आणि आनंददायक चित्रे किंवा शोपीस ठेवा.
- देवघर व्यवस्थित ठेवा आणि तुटलेल्या मूर्ती काढून टाका.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सामंजस्य वाढेल.
हेही वाचा : Kitchen Tips : कधीच खराब न होणारे पदार्थ
Edited By : Prachi Manjrekar