हिंदू धर्मात आठवड्यातील वारानुसार अनेक गोष्टींचे नियम सांगितले जातात. आठवड्याच्या कोणत्या वाराला केस कापावे, कधी दाढी करावी, कधी केस धुवावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. चूकीच्या वाराला केस कापल्या किंवा दाढी केल्याने त्याचे अशुभ फळ भोगावे लागतात. यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होऊन आरोग्यावर देखील वाईट प्रभाव पडतो. तसेच हिंदू शास्त्रात सांगितल्या प्रमाणे योग्य वाराला केस कापल्या किंवा दाढी केल्याने त्याचे शुभ फळ देखील तुम्हाला मिळते.
केस-दाढी काण्यासाठी ‘हे’ आहेत अशुभ दिवस
सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी या पाच दिवशी केस कापू नये, दाढी करु नये आणि नखं देखील कापू नये. कारण यामुळे आरोग्यसंबंधित समस्या निर्माण होतात. दुर्भाग्याचा सामना करावा लागतो. धनहानीचा सामना देखील करावा लागतो.
केस-दाढी काण्यासाठी शुभ दिवस
बुधवारी आणि शुक्रवारी केस कापणं, दाढी करणं आणि नखं कापणं शुभ मानलं जातं असं केल्यास घरात सुख-समृद्धी येते. धन लाभ होतो. सुंदरता वाढते. आयुष्यात प्रेम वाढते.
हेही वाचा :
सतत नखं कुरतडण्याची सवय तुम्हाला पडू शकते महागात; कारण…