हिवाळा सुरु झाला की त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी अनेकजण बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा प्रचंड वापर करतात. मात्र, सर्वांनाच हे प्रोडक्ट्स सूट होत नाहीत. अशावेळी तुम्ही स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा आवर्जून वापर करु शकता. ज्यामुळे तुमची त्वची आणि केस निरोगी राहतील.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर गोष्टी
- बदाम
बदामातून ‘ड’, ‘ई’ ही जीवनसत्त्वे, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम मिळते. बदामाचे तेल हे उत्तम मॉइश्चरायझर मानले जाते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो व केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
- जवसाचे तेल
यात ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 असते. तसेच यातील क्षार व प्रथिनांमुळे कोंडा कमी होतो. त्वचेवरील सुजेसाठी हे उपयुक्त आहे.
- ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलला बाथ ऑइल, मॉइश्चरायझर, नाईट क्रीम म्हटले जाते. अँटीऑक्सिडंट असल्याने जखमेवर उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑइलचा आहारात नियमित वापर असावा.
- दालचिनी
दालचिनीमध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल घटक असतात. त्वचा आरोग्यास उपयुक्त असून दालचिनी, मधाची पेस्ट पिंपल ट्रीटमेंटसाठी वापरली जाते. दालचिनीचे तेल मसाजसाठी वापरले जाते.
- आलंआलं, मीठ, लिंबू यांचे ताजे मिश्रण पचनास अतिशय उपयुक्त असते. अॅसिडिटीचा त्रास असणार्यांनी दिवसभरात थोडे थोडे घ्यावे.
- हळद
हळद रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असून थंडीत गरम दुधात घालून घ्यावी. हळद अँटी एजिंग मानली जाते. पण हळदीत अँटीऑक्सिडंटही असतात. त्यामुळे पेशींचा र्हास होत नाही. जखमा भरून येतात. हळदीमुळे रक्तस्रावही थांबतो.
हेही वाचा :