घर लाईफस्टाईल ब्लू बेरी आणि गोजी बेरीचे 'हे' आहेत फायदे

ब्लू बेरी आणि गोजी बेरीचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

ब्लू बेरी हे फळ स्वादिष्ट असण्यासोबतच अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात.  ज्यांची शरीराला वेगवेगळ्या कार्यांसाठी गरज असते. ब्लूबेरी लहान, गोलाकार आणि निळ्या रंगाची असते. या फळाला ‘नीलबदरी’ असेही म्हणतात. हे फळ अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असल्याने शरीरातील अनेक समस्या दूर करण्यात हे फळ मदत करू शकते. हे फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फळ सर्वात पौष्टिक बेरींपैकी एक मानले जाते. ब्लूबेरी केवळ चवदार नसतात. तर संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी या फळाचे सेवन करणे उत्तम मानले जाते.

Our Guide to Berries | Whole Foods Market

‘असे’ आहेत ब्लूबेरीचे फायदे

  • ‘ब्लूबेरी’ खाल्ल्याने कमी-रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • ब्लूबेरी फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात.
  • जे आपल्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.
  • ब्लूबेरीचे सेवन केल्याने जळजळ कमी होते आणि अनेक आजार टाळता येतात.
  • ब्लूबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
  • यामुळेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ तुम्हाला खूप मदत करू शकते.
  • ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते, जे त्वचेला आवश्यक पोषक तत्त्वे मिळून देतात.
- Advertisement -

Why Do We Call Them Berries? - Dictionary.com

गोजी बेरी चवीला गोड असते. गोजी बेरीचा आरोग्यासाठी एक उत्कृष्ट हर्बल टी देखील बनवता येतो. ह्याचा अर्क, पावडर आणि गोळ्या देखील अनेक आरोग्य समस्यांवर औषध म्हणून घेतल्या जातात. ब्लूबेरी प्रमाणे, गोजी बेरी देखील अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. जे शरीराला हानिकारक पदार्थांपासून वाचवतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गोजी बेरीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, लोह, जस्त आणि अँटिऑक्सिडंट असतात.

- Advertisement -

Goji - Australian School of Meditation & Yoga | ASMY

‘असे’ आहेत गोजी बेरीचे फायदे

  • हे फळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
  • याव्यतिरिक्त, त्यात कॅरोटीनोइड्स, लाइकोपीन, ल्युटीन आणि पॉलिसेकेराइड्स सारख्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात.
  • लिंबू आणि संत्र्यापेक्षा गोजी बेरीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे.
  • गोजी बेरीमध्ये प्रोटीन आणि फायबर व्यतिरिक्त, त्यात तांबे, लोह, सेलेनियम आणि जस्त या सारखी खनिजे असतात.
  • जी आपल्या शरीराच्या विविध भागांसाठी अतिशय आवश्यक असतात.

हेही वाचा :

कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खाल्ले पाहिजेत?

- Advertisment -