Saturday, January 11, 2025
HomeमानिनीBungee Jumping : बंजी जंपिंगसाठी ही आहेत बेस्ट ठिकाणे

Bungee Jumping : बंजी जंपिंगसाठी ही आहेत बेस्ट ठिकाणे

Subscribe

आपल्या प्रत्येकाची एक तरी विशलिस्ट असते. जी आपल्याला एकदातरी पूर्ण करायची असते. ही बकेटलीस्ट पूर्ण करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. काही जण या सुवर्ण संधीची आतुरतेने वाट पाहत असतात. काही लोकांना साहसी अॅडव्हेंचरस खूप आवडतात. ट्रेकिंग, राफ्टिंग, स्काय डायव्हिंग, बंजी जंपिंग, पर्वतारोहण, जंगल सफारी इत्यादी एक्सप्लोर करण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. तसेच अनेकांना बंजी जंपिंगची आवड असते. जर तुम्हालाही बंजी जंपिंग आवडत असेल तर तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी भेट देऊ शकता.

बंजी जंपिंगला जाताना आधी त्या भागाची पूर्व माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्या जागेबद्दल, ती जागा बंजी जंपिंगसाठी योग्य आहे का याची संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यानंतर त्या ठिकाणी जाणून तुम्ही भेट देऊ शकता. खालील ठिकाणे बंजी जंपिंगसाठी उत्तम आणि सुरक्षित आहे.

- Advertisement -

कोलाड

हे ठिकाण रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलाडमध्ये आहे . बंजी जंपिंगसाठी ही जागा उत्तम आहे. या भागाचे वैशिष्ट्ये म्हणजे, जलाशयाजवळ निसर्गरम्य वातावरणात या भागात अनुभवायला मिळते. याची उंची साधारण 40-50 मीटर आहे.

लोणावळा

लोणावळा हे पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण असून, येथे तुम्ही अनेक साहसी अॅडव्हेंचर करू शकता. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि हिरवळीत बंजी जंपिंगचा थरार अनुभव तुम्ही घेऊ शकता. याची उंची साधारणपणे 45-50 मीटर आहे.

- Advertisement -

दांडेली

दांडेली हे महाराष्ट्राच्या सीमेवर कर्नाटकमध्ये असलेले दांडेली बंजी जंपिंगसाठी प्रसिद्ध आहे. या भागाचे वैशिष्ट्ये म्हणजे, येथे घनदाट जंगल आणि काली नदीच्या परिसरात निसर्गाचा आस्वाद तुम्ही बंजी जंपिंगचा अनुभव घेऊ शकता. याची उंची साधारण 25-30 मीटर आहे.

मुंबई

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही अॅडव्हेंचर करू शकता. मुंबईमध्ये काही साहसी संस्थांकडून बंजी जंपिंग इव्हेंट्स आयोजित केले जातात. त्या इव्हेंट्समधेय तुम्ही भाग घेऊन बंजी जंपिंग करू शकता.

गोवा

गोवामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी बंजी जंपिंग करू शकता. गोवामध्ये बंजी जंपिंगची उंची कमी असल्याने तुम्हा हा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.

बंजी जंपिंग करण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • बंजी जंपिंग करताना सेफ्टी बेल्ट जे काही तुम्ही सुरक्षितेसाठी लावलं असेल ते नीट लावलं का हे आधी तपासून घ्या.
  • जर तुम्हाला हार्टचा किंवा कोणतेही मेडिकल कंडिशन असेल तर बंजी जंपिंग करू नका.
  • जर तुमचं वय 15 पेक्षा कमी असेल 60 पेक्षा जास्त असेल तर बंजी जंपिंग करू नका हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

हेही वाचा : New Year Celebration : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी परफेक्ट बीच डेस्टिनेशन्स


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini