काश्मीर तिथल्या संस्कृतीइतकाच सुंदर आहे. येथील कपडे आणि पारंपारिक वस्तू केवळ काश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. आणि तुम्हालाही जर का काश्मिरी वस्तू खरेदी करायच्या असतील तर इथली काही ठिकाणे तुमच्यासाठी आहेत खूप फायदेशीर. तसेच जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. या काश्मीरमध्ये सुंदर दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत आणि रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेले हे जम्मू-काश्मीर एक हिरा म्हणून सर्वत्र ओळखले जाते. तसेच या शहारत लोक बाहेरून दूर दूर वरून फिरायला येथे येतात.
तसेच जर का तुम्ही संपूर्ण काश्मीर फिरलात तर येथे भेट देण्यासारखे बरेच काही आहे. पण जर तुम्हाला खरेदीची खूप आवड असेल तर काश्मीरची ही ठिकाणे तुम्ही नक्की फिरू शकतात. यासोबतच येथे फिरताना आणि येथे खरेदी करताना एक वेगळीच मजा आहे. विशेष म्हणजे काश्मीरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही अनेक उत्कृष्ट वस्तू खरेदी करू शकता. तर आता आपण काश्मीरमधल्या शॉपिंगच्या ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत…
1. बादशाह चौक
जर तुम्ही श्रीनगर, काश्मीरमध्ये असाल तर तुम्ही येथे खरेदीसाठी बादशाह चौकला भेट देऊ शकता. या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर काश्मिरी वस्तू मिळतील. तुम्ही येथून हस्तकलेच्या वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू आणि काश्मीरच्या पारंपारिक अनेक वस्तू येथून खरेदी करू शकता. तसेच हाताने विणलेले पारंपारिक काश्मिरी गालिचे याच ठिकाणी मिळतात. तसेच हे गालिचे इथले प्रसिद्ध गालिचे म्हणून ओळखले जातात. येथील बहुरंगी कार्पेट खूप सुंदर पाहायला मिळतात तसेच त्यांची स्टाईल आणि डिझाइन्स इतके छान असतात की तुम्हाला ते खरेदी करण्यास भाग पाडतात.
2. लडाख आर्ट पॅलेस
लडाख आर्ट पॅलेसमध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला हवी ती सर्व खरेदी करू शकता. हायलँड पार्क कॉम्प्लेक्समध्ये असलेले, लडाख आर्ट पॅलेस हे गुलमर्गमधील खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. येथे, आपण हाताने तयार केलेल्या अनेक वस्तू, तसेच प्राचीन वस्तू आणि दागिने यासारख्या गोष्टी खरेदी करू शकता. यासोबतच जर का तुम्हाला गुलमर्गमधून उत्तम कार्पेट घ्यायचे असेल तर तुम्ही ते या दुकानातून खरेदी करू शकता. याशिवाय या स्टोअरमध्ये कपड्यांचे आणि ड्रेसेसचेही कलेक्शन आहे. त्यामुळे तुम्ही लडाख आर्ट पॅलेसमध्ये जाऊन तुमच्या आवडीची कोणतीही वस्तू येथे खरेदी करू शकता.
3. लाल चौक
श्रीनगरमधील सर्वोत्कृष्ट खरेदी ठिकाणांमध्ये लाल चौकाचेही नाव घेतले जाते. हे एक प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाण आहे, जिथे खरेदीसाठी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. बेडशीट, शाल, कार्पेट आणि हस्तकलेच्या वस्तू घ्यायच्या असतील तर हे मार्केट एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला वस्तू थोड्या महाग मिळतील, पण तुम्ही खरेदी करताना बार्गेनिंग करायला विसरू नका. तसेच लाल चौक हा श्रीनगर शहराच्या मध्यभागी असलेला एक चौक आहे, ज्यामध्ये 1980 मध्ये एक क्लॉक टॉवर बांधण्यात आला होता. येथील मार्केट हे पारंपारिक पद्धतीने आयोजित केले जाते. आता या बाजारपेठेचा विस्तार करण्यात आला असून, या ठिकाणी रस्त्यावरील बाजार देखील मोठ्याप्रमाणात भरला जातो.