लग्नानंतरची पहिली अॅनिव्हर्सरी खूप खास असते. हा क्षण देखील खूप अविस्मरणीय असतो.नव्याने सुरू झालेल्या प्रवासातील पहिल्या वर्षाचा हा उत्सव असतो. एकमेकांसोबत अनुभवलेल्या सुखद आठवणींना आणि नात्यातील घट्टपणा. या दिवशी नवरा बायको कुठेतरी बाहेर फिरायला जातात. हा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या जोडीदाराला काही खास भेटवस्तू देतो.
बऱ्याचदा पर्याय खूप असले की, आपल्याला कळत नाही, कोणती भेटवस्तू आपण देऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात, पहिल्या अॅनिव्हर्सरीला आपण आपल्याला जोडीदाराला कोणती हटके भेट वस्तू देऊ शकतो.
फोटो फ्रेम
तुम्ही तुमच्या लग्नाची एखादी खास आठवण फोटो फ्रेम म्हणून देऊ शकता . ही फोटोफ्रेम तुम्ही एक गाेडहे खूप उत्तम गिफ्ट आहे.
स्क्रॅपबुक
आजकाल बरेच लोक आपल्या लग्नाचा प्रवास स्क्रॅपबुकमध्ये चित्रीकरण करतात. हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
कस्टमाइज्ड ज्वेलरी
तुम्ही तुमच्या पत्नीला कस्टमाइज्ड ज्वेलरी भेट वस्तू म्हणून देऊ शकता. तुमच्या पत्नीच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही ज्वेलरी डिजाइन करू शकता.
वीकेंड ट्रिप
तुम्ही एक सुंदर सरप्राइज वीकेंड ट्रिप प्लॅन करू शकता. तुमच्या जोडीदाराला सरप्राइज देऊ शकता.
पत्र
तुम्ही तुमच्या हाताने पत्र देखील लिहू शकता. या पत्रामध्ये तुमच्या भावना व्यक्त करु शकता. हे तुमच्या जोडीदाराला खुप आवडले.
घरगुती वस्तू
तुम्ही तुमच्या घरी कामी येईल घरगुती वस्तू देखील वापरू शकता.
हेही वाचा : Secret Santa Gift Ideas : सिक्रेट सांतासाठी हटके गिफ्ट आयडिया
Edited By : Prachi Manjrekar