Sunday, May 19, 2024
घरमानिनीMethi Water: मेथीचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

Methi Water: मेथीचे पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

Subscribe

लहान पिवळ्या बिया म्हणजे मेथी दाणे किंवा fenugreek seeds आपल्या भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. मेथी दाणे खाण्याचा स्वाद वाढविण्यासाठी अनेक आजारांवरही गुणकारी ठरतात. मेथी दाण्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्व आढळतात. वजन नियंत्रणात राखण्यापासून ते अगदी शरीर डिटॉक्सीफाय करण्यापर्यंत याचा फायदा होतो. मेथीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

मेथीचे पाणी घरी कसे तयार करावे?

  • एका कढईत मेथीचे दाणे घ्या आणि त्याला चांगले भाजून घ्या.
  • त्यानंतर मेथी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या.
  • एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मेथीची पूड घाला आणि मिक्स करा.
  • अशा प्रकारे मेथीचे पाणी तयार केले जाते.

मेथीचे पाणी पिण्याचे फायदे :

वजन कमी करण्यासाठी

मेथीचे पाणी पिल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळ भरल्यासारखे वाटते. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे अतिरिक्त भूक लागत नाही आणि उगीचच पदार्थ खाल्ले जात नाहीत.

- Advertisement -

अपचनपासून बचाव

मेथी किंवा मेथीचे पाणी तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि ते तुमच्या आतड्याची हालचाल सुधारण्यास मदत करते. हे पचनाच्या समस्यांशी लढण्यास मदत करते. हे पचनाच्या इतर समस्यांसह बद्धकोष्ठता, अपचन यापासून बचाव करते.

केसांची समस्या

मेथीच्या दाण्यांमध्ये पोषक तत्व असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळते, केसांचे प्रमाण सुधारते आणि केसांच्या समस्या जसे की कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.

- Advertisement -

हेही वाचा : Sweating a lot : जास्त घाम येतो? फॉलो करा या टिप्स

मधुमेहासाठी उत्तम

मेथीच्या बिया मधुमेहांसाठी उत्तम उपाय आहेत . मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मेथीच्या दाण्यातील अमीनो ॲसिड संयुगे स्वादुपिंडात इन्सुलिन स्राव वाढवतात ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

हृदयाशी संबंधित आजार कमी करण्यासाठीही भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. मेथीचे पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्टसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसंच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते.

हेही वाचा : आयुर्वेदानुसार फ्रुट शेक पिणं धोक्याचं

____________________________________________________________________

Edited By : Nikita shinde

- Advertisment -

Manini