शरीरासाठी पौष्टिक मल्टीग्रेन पीठाची भाकरीचे हे आहेत चमत्कारी फायदे

मल्टीग्रेन भाकरीच्या पीठामध्ये विटामीन, मिनरल आणि प्रोटीन यांसारखे पोषक तत्व असतात. या भाकरीचे नियमीत सेवन केल्यास शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. तसेच यामुळे पचनक्रिया देखील मजबूत होते.

जर तुमची पचनक्रिया नेहमी खराब असते किंवा पोटा सतत गॅस तयार होत असेल. तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करायला हवा. अनेकदा चुकीचा आहार घेतल्यामुळे आपली पचनक्रिया खराब होते. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आहारामध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करायला हवा. सोबतच मल्टीग्रेन पीठापासून तयार भाकरी खायला हवी. यामुळे तुमची पचनक्रिया सुद्धा ठिक राहिल. शरीरामधील पोषक तत्वांची कमतरता दूर होईल आणि रोग प्रतिरोधक क्षमता देखील वाढेल.

मल्टीग्रेन भाकरीच्या पीठाचे काय फायदे आहेत?
मल्टीग्रेन भाकरीच्या पीठामध्ये विटामीन, मिनरल आणि प्रोटीन यांसारखे पोषक तत्व असतात. या भाकरीचे नियमीत सेवन केल्यास शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. तसेच यामुळे पचनक्रिया देखील मजबूत होते.पोटामध्ये गॅस आणि कफाचा त्रास देखील होत नाही. ज्यांचे वजन वाढत नाही त्यांच्यासाठी देखील हा पोषक आहार आहे. त्यांनी नियमीत या भाकरीचे सेवन करायला हवे.

मल्टीग्रेन भाकरी पीठ कसे तयार कराल?

  • गहू – 1 किलो
  • ज्वारी – पाव किलो
  • बाजरी – पाव किलो
  • नाचणी – पाव किलो
  • मका – पाव किलो
  • चना – पाव किलो
  • मूग डाळ – पाव किलो

मल्टीग्रेन पीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम गहू, बाजरी, ज्वारी, चना आणि मका, नाचणी, मूग डाळ हे सर्व धान्य एकत्र करून त्याचे पीठ चक्कीतून पीठ तयार करून आणा.


हेही वाचा : 

हृदय मजबूत ठेवण्यासाठी अक्रोड आणि बदामापासून तयार करा हे मिक्स ड्रायफ्रुट्स शेक