आपल्या शरीरासाठी कॅल्शिअम खूप महत्वाचे असते. कॅल्शिअमची कमतरता नसेल तर कोणतेही आजार होणार नाही. कॅल्शियमची कमतरता झाल्यास सांधेदुखी, स्नायू क्रॅम्प, कमकुवत नखे, मासिकमध्ये जास्त त्रास यासारख्या समस्या निर्माण होतात. महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. आज आपण कॅल्शिअम कमी असल्याची लक्षणे बदल जाणून घेऊयात.
कॅल्शिअम कमी असल्याने या समस्या निर्माण होतात
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, हाडे ठिसूळ होतात
कॅल्शिअमची कमी निर्माण झाल्यामुळे हाडे ठिसूळ होऊन लवकर मोडण्याचा धोका वाढतो.
स्नायूंमध्ये वेदना जाणवणे
कॅल्शियमची कमतरता झाल्यास स्नायू अकडू वेदना किंवा गोळा येतात.
थकवा आणि अशक्तपणा
शरीरात सतत थकवा आणि ऊर्जा कमी वाटते.
कॅल्शिअमची कमतरता दूर करण्याचे उपाय
आहार
योग्य आहार घेतल्याने कॅल्शिअमची कमतरता दूर होईल. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रूट्स, डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश करा.
व्यायाम
हाडे मजबूत करण्यासाठी नियमित व्यायाम करा. योगासने, चालणे, धावणे, किंवा वजन उचलण्याचे व्यायाम प्रभावी ठरेल.
कॅल्शियम सप्लिमेंट्स
जर तुम्हाला आहारातून कॅल्शियम मिळत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D चे सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता.
दूध
दूध कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी मदत करते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही दूधासह इतरही पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियमची पातळी वाढवू शकता.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स घेऊ शकता.
- सोडा व कॅफिन या पदार्थां हाडे कमकुवत होतात
- नियमित व्यायाम: वजन उचलण्याचा व्यायाम आणि योगासने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
- तंबाखू आणि मद्यपान हाडांवर वाईट परिणाम होतो.
हेही वाचा : Health Tips : या पदार्थांनी करा शुगर क्रेविंग कंट्रोल
Edited By : Prachi Manjrekar