आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करण्याचा ट्रेंड बऱ्यापैकी वाढलाय. डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ लोंकांमध्ये वाढत असताना गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती देण्यात येते. याशिवाय जोडीदारावरील प्रेम समुद्रापेक्षाही खोल आहे हे दाखवण्यासाठी समुद्र किनारी लग्न करणे हा उत्तम पर्याय आहे. देशात लग्नासाठी गोव्यापेक्षा चांगले समुद्रकिनारे तुम्हाला सापडणार नाहीत. याशिवाय तुम्ही गोव्यात हनीमूनही साजरा करू शकता. कारण भारतीयांसाठी हनिमूनच्या यादीत गोवा हे पहिले येते.
कँडोलिम समुद्रकिनारा –
कँडोलिम समुद्रकिनारा कपलसाठी ओळखला जातो. स्वच्छ वाळूचे ढिगारे आणि प्रिसेंस नदीजवळ वसलेले हे ठिकाण शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हा तुम्हाला उत्तम पर्याय ठरू शकतो.
वॅगेटोर समुद्रकिनारा – लाल खडक असलेले वॅगेटोर बीच सुंदर हिरवाईसाठी ओळखले जाते. शांतता असलेले हे ठिकाण कपलसाठी डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम पर्याय आहे.
कळंगुट समुद्रकिनारा – गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची राणी म्हणून कळंगुट समुद्राकिनाऱ्याकडे पाहिले जाते. हे ठिकाण सोनेरी चमकदार वाळूसाठी ओळखले जाते. याशिवाय येथे विदेशी पर्यटक सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. तुमच्या लग्नाचा अनमोल क्षणांसाठी हा समुद्रकिनारा बेस्ट ऑप्शन आहे.
अंजुना समुद्रकिनारा –
एका बाजूने अरबी समुद्राने वेढलेला आणि दुसरीकडे खजुराची झाडे असणारा अंजुना समुद्रकिनारा गोव्यात त्याच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथली खडकाळ रचना अत्यंत वेगळी आहे. संध्याकाळी तर अंजुना समुद्रकिनारी स्वर्गात गेल्याचे भास होतो.
मँड्रेम समुद्रकिनारा –
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे मँड्रेम समुद्रकिनारा. हे बीच डेस्टिनेशन वेडिंग साठी ओळखले जाते. या समुद्रकिनारी तुम्हाला एकाहून अधिक रिसॉर्ट दिसतील. जेथून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय थेट पाहू शकता.