मकरसंक्रांतीला ट्रेडिशनल लूकसह ट्रेंडी टच हवा असेल तर तुम्ही काही काळ्या ड्रेसची निवड करू शकता. जर तुम्हाला मकरसंक्रांती साडी नेसायची नसेल तर ड्रेस हा उत्तम पर्याय. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला हल्ली बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे ड्रेस पाहायला मिळतील. तुम्ही स्टायलिश डिझाइन्स, हलकी एंब्रॉयडरी आणि आकर्षक ड्रेसची निवड करू शकता. आज आपण जाणून घेऊयात मकरसंक्रांतीसाठी कोणते काळे ड्रेस आहेत बेस्ट.
ब्लॅक अनारकली ड्रेस
तुम्ही गोल्डन बॉर्डर असलेली अनारकली ड्रेसची निवड करू शकता. हा ड्रेस मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमासाठी योग्य आहे. या ड्रेससह ऑक्सिडाइज झुमके खूप सुंदर दिसतील अशाप्रकारे तुम्ही संपूर्ण लूक क्रिएट करू शकता. हा ड्रेस तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन साधारणपणे १००० किंवा २००० रुपयांपर्यत मिळेल.
ब्लॅक कुर्ती
जर तुम्हाला सिम्पल लूक करायचा असेल तर तुम्ही ब्लॅक कुर्तीसह रंगीबेरंगी पाटियाला सलवार आणि फुलकारी दुपट्ट्याचा पर्याय निवडू शकता.
ब्लॅक ट्यूनिक विथ पलाझो
मॉडर्न लूक हवा असेल तर ब्लॅक ट्यूनिक किंवा लॉन्ग टॉपला प्रिंटेड पलाझोसोबत पेअर करा.हा तुमचा मॉडर्न लूक खूप सुंदर दिसेल.
कस्टमाइज
तुम्ही तुमचा ड्रेस कस्टमाइज देखील करू शकता. कस्टमाइज करण्यासाठी जर तुझ्याकडे एखादा ड्रेस असेल आणि त्याला फेस्टिव्ह टच द्यायचा असेल तर सिल्कचा रंगीत दुपट्टा किंवा ऑक्सिडाईज ज्वेलरी घालून स्टायलिश लूक देऊ शकता.
लेहंगा
मकरसंक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाचा लेहंगा देखील घालू शकता. त्या लेहंग्यावर ऑक्सिडाईज ज्वेलरी घालून स्टाइल करू शकता. तुमचा हा लूक खूप आकर्षक दिसेल.
आयडीयाज
तुम्ही अभिनेत्रींच्या काही आयडीयाज घेऊन मकरसंक्रांतीचा लूक क्रिएट करू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : डिनर डेटसाठी परफ्केट लॉन्ग ड्रेसेस
Edited By : Prachi Manjrekar