वॉशिंग मशीनमुळे महिलांची हाताने कपडे धुण्याचे कष्ट वाचले आहेत. त्यामुळे हल्ली प्रत्येक घरात वॉशिंग मशीन हमखास दिसते. वॉशिंग मशीनमध्ये लहान सहान कपड्यांपासून ते जड गोंधड्यापर्यत कपडे धुण्यात येतात. काही महिला तर शुजही वॉशिंग मशीनमध्ये धुतात. पण, प्रत्येक गोष्ट ही वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुण्यासारखी नसते हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जाणून धेऊयात, वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुवू नयेत.
लोकरीचे कपडे –
वॉशिंग मशीनमध्ये चुकूनही लोकरीचे कपडे धुवू नये. लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याने त्यांची क्वॉलिटी खराब होऊ शकते. खरं तर, लोकरीचे कपडे हातानेच धुणे योग्य असते. याशिवाय लोकरीचे कपडे धुण्यासाठी सॉफ्ट डिटर्जटचा वापर करायला हवा.
हेवी डिझायनर कपडे –
वॉशिंग मशीनमध्ये डिझायनर कपडे धुणे महागात पडू शकते. डिझायनर कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याने त्यावरील वर्क खराब तर होतेच शिवाय वॉशिंग मशीनचे नुकसान होऊ शकते. डिझायनर ड्रेसमधील एखादा मणी किंवा मोती वॉशिंग मशीनमध्ये अडकून मशीन खराब होऊ शकते. त्यामुळे हेवी डिझायनर कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळायला हवे.
हट्टी डाग –
अनेकदा कपड्यांवर लागलेले हट्टी डाग हाताने धुण्यास अधिक मेहनत असल्याने महिला असे कपडे मशीनमध्ये धुण्यास टाकतात. पण, असे कपडे धुण्याआधी जर त्या कपड्यांवर ऑइलचे, स्वयंपाकाचे किंवा तेलाचे डाग असतील तर असे कपडे धुणे टाळायला हवे.
रेनकोट –
वॉशिंग मशीनमध्ये चुकूनही रेनकोट धुण्यास ठेवू नये. कारण जेव्हा तुम्ही रेनकोट मशीनमध्ये धुण्यास टाकता तेव्हा रेनकोट फुगून फाटण्याची शक्यता असते.
फॅन्सी ब्रा –
फॅन्सी ब्रा चे हुक, पॅड वॉशिंग मशीनमध्ये अडकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शक्यतो ब्रा, अंडरवेयर हातानेच धुण्याचा प्रयत्न करावा.
लेस असणारे कपडे –
वॉशिंग मध्ये कधीच लेस असणारे कपडे धुवू नयेत. लेस असणारे कपडे नाजूक असतात. त्यामुळे अडकून फाटू शकतात. म्हणून असे कपडे हातानेच धुवावेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali shinde