घरलाईफस्टाईलपावसाळ्यात 'या' ठिकाणी जाणं टाळा

पावसाळ्यात ‘या’ ठिकाणी जाणं टाळा

Subscribe

पावसाळा आला की सर्व जण कुठे तरी फिरायला जाण्याचे वेगवेगळे प्लॅन करत असतात. मित्र-मैत्रीणी, घरचे किंवा ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत पिकनिकचे प्लॅन केले जातात. पावसाळ्याच्या दिवसात आपण दरड कोसळल्याची, धबधब्यात पर्यटक वाहून गेल्याचे अशा अनेक बातम्या ऐकत असतो. त्यामुळे जर ही पिकनिक चांगल्या ठिकाणी करायची असेल तर या ठिकाणी जाणं टाळा. या दिवासात काही ठिकाणी जाणं फार धोक्याचं असतं. कधी काही होऊ शकले हे सांगता येत नाही. पावसाळ्यात आपण जरी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी जात असलो तरी कोणत्या ठिकाणी जाणं हे आपल्यााला सुरक्षित आहे हे माहिती असणे गरजेच असत.

समुद्र किनाऱ्यावर 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

जेव्हा आहोटीचा काळ असेल तेव्हा शक्यतो पाण्यात जाऊ नये. कारण आहोटी आत खेचून घेते आणि भरती बाहेर फेकते. पाण्यात जात असाल तर मद्यपान करु नका. समुद्रात लाटा आडव्या लांबलचक तयार होत असतील आणि त्या तिथे फुटत असतील तर तो उथळ किनारा असतो. त्यामुळे तिथे जाणं धोकादायक असते. ज्या बीचवर गार्ड्स नसतील तर त्या बीचवर जाणं टाळा. काही ठिकाणी मध्येच खडक असतात. त्यामुळे पडण्याची शक्यता असते.

हरिहर किल्ला

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या जवळ हरिहर किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या अरुंद स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे किल्ल्यावर एकच माणूस चढू उतरू शकतो. जर ग्रुपने गेल्यात तर प्रोब्लेम होऊ शकतो.
तसेच या किल्ल्यावर प्रवाश्यांची गर्दी जास्त होत असल्यामुळे पर्यटकांना तीन महिने तिथे जाणं बंद केलं आहे.

माहुली

माहुली हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. या उंच किल्ल्यावरून हिरवागार निर्सग पाहण्यासाठी गर्दी केली जाते. हा किल्ला गुंतागुंतीच्या संरचनेमुळे रॉक क्लाम्बर्समध्ये लोकप्रिय आहे. पावसाळ्यात या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी खूप लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -