Wednesday, December 4, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीWinter Health Care : हिवाळ्यात या ड्रिंक्सने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Winter Health Care : हिवाळ्यात या ड्रिंक्सने वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Subscribe

हिवाळ्यात थंडी जास्त असल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशातच व्हायरल इन्फेक्शन ही जवळपास प्रत्येक घरातील समस्या ठरते. ताप सर्दी आणि खोकला हे सर्व आजरा लगेच उद्भवतात. या आजारांकडे दुर्लक्ष केले तर समस्या अजून वाढू शकते. हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. या दिवसात आपल्याला इम्युनिटीची गरज असते, त्यामुळे तुम्ही काही घरगुती हेल्थी ड्रिंक्स बनवू शकता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोणत्या ड्रिंक्सने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

तुळशीचा चहा

हिवाळ्यात तुळशीचा चहा उत्तम असतो .तुम्ही घरीच हा चहा बनवू शकता. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी एक कप पाण्यामध्ये 7 ते 8 तुळशीची पाने उकळा. त्यामध्ये चिमूटभर मध आणि मिरी घाला. नियमित तुळशीचा चहाचं सेवन केल्याने इम्युनिटी वाढेल.

- Advertisement -

हळदीचे दूध

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. हळदीच्या दुधात थोडं मध आणि सुंठ पावडर घालून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

आल्याचा चहा

आल्यामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे ते सर्दी आणि खोकल्यावर उपयुक्त आहे. या चहात थोडं लिंबाचा रस आणि मध घालून पिल्यास आजार त्वरित दूर होऊन जातील.

- Advertisement -

लिंबूपाणी आणि मध

गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन C चं प्रमाण वाढतं, ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होते.

ड्रायफ्रूट मिल्कशेक

बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर घालून बनवलेला मिल्कशेक शरीराला उष्णता देतो आणि पोषणमूल्ये वाढवतो. हिवाळ्यात थकवा कमी करण्यासाठी हे उत्तम पेय आहे.

काढा

तुळस, आलं, मिरी, दालचिनी, आणि गवती चहा घालून बनवलेला काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. हे सर्दी, खोकला इत्यादी आजार देखील होतात.

गुळ-आलं पाणी

गरम पाण्यात गूळ आणि आलं मिसळून घेतल्याने पचन सुधारतं आणि शरीर उष्ण राहते.

या सर्व ड्रिंक्सने हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि शरीर देखील सुदृढ राहील.

हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी हे उपाय करा


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini