घरताज्या घडामोडीपुण्यातली खाऊगल्ली

पुण्यातली खाऊगल्ली

Subscribe

पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. त्याला कारणही तसेच आहे. कारण पुण्यात काय मिळत नाही असे काही नाही. मुंबईप्रमाणेच पुण्यातही जगातली कुठलीही वस्तू मिळते. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर आणि आता आयटी हब असं पुण्याबदद्ल बोललं जातं. पण आता मुंबई आणि इतर शहरांप्रमाणेच पुणेही अद्ययावत झालं आहे. पुण्यातही आता खाऊ गल्ली, फॅशन स्ट्रीट आहेत. आज आम्ही पुण्यातल्या खाऊ गल्लीबदद्ल सांगणार आहोत.

जे एम रोड, खाऊ गल्ली, शिवाजीनगर

- Advertisement -

जे एम रोड विशेष करून ओळखला जातो तो तिथेल हॉटेलिंगसाठी. पण त्याच रोडवर असलेल्या खाऊ गल्लीची भुरळ तरुणांना पडते. येथे असलेल्या स्टॉलवर सगळंच मिळतं. अगदी टेस्टी वडापाव, सॅण्डविचेस, पराठा, दक्षिण दावणगिरी डोश्यापासून खमंग साबुदाणा वड्याबरोबर झणझणीत ठेचाही येथे मिळतो. यामुळे पुण्याला जेव्हा कधी जाल तेव्हा या खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. पारंपारिक आणि आधुनिक पदार्थांच्या रेलचेलीचा आस्वाद येथे नक्की घ्या.

न्यूक्लियस मॉल खाऊ गल्ली

- Advertisement -

ही पुण्यातील सर्वात जुनी खाऊ गल्ली आहे. पावभाजी, मिल्कशेक, पराठा, चायनिज, पंजाबी डिशेस येथे मिळतात. विशेष म्हणजे येथे मॉल असूनही लोक या स्ट्रीट फूडला पसंती देतात.

सारस बाग

पुण्यातील सारस बाग ही तर जगप्रसिद्ध बाग आहे. बागेत गणपती मंदिर असून बागेच्या बाहेर असलेली सारसबाग चौपाटी म्हणजे पुणेकरांच हक्काचं ठिकाण. पाव भाजी ते कॅंडी येथील सगळेच पदार्थ अफलातून.

कोथरुड खाऊ गल्ली

कोथरुडमध्येही आता खाऊ गल्ली आकार घेत आहे. येथे टेस्टी मॉमॉजपासून, गरमागरम भजी ते मिल्कशेक, कबाब, पापडी चाट ते समोसा चाट आणि बरचं काही येथे मिळते. यामुळे खवय्यांची पावलं आता कोथरुडच्या खाऊ गल्लीत वळायला लागली आहेत.

सदाशिव पेठ खाऊ गल्ली

सदाशिव पेठेतील खाऊ गल्ली ही तेथे मिळणाऱ्या अफलातून आणि हटके पदार्थांसाठी फेमस आहे. आतापर्यंत आपण समोसा चटणी खाल्ली आहे. पण येथे मिळणाऱ्या समोश्यात टाकण्यात येणाऱ्या चटणी आणि शेव खाण्यात वेगळीच मज्जा आहे. यामुळे वेगळी चव घ्यायची असेल तर सदाशिव पेठेतील खाऊ गल्लीला भेट द्यावी लागणार आहे.


हेही वाचा – ज्वारीची इडली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -