थंडी वाढली असून तापमानात हळूहळू घट होत चालली आहे. त्यामुळे घसरत्या तापमानात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी शरीराला उबदार ठेवणे आवश्यक असते. शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी तुम्ही योग्य आहार घ्यायला हवा. या आहाराद्वारे शरीराला आतून उब मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थाची नावे सांगणार आहोत, जे खाल्याने शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी मदत करतात.
काजू, बदाम, अंजीर –
थंडीत तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करायला हवे. ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, अंजीर खाणे फायद्याचे ठरेल. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते.
खजूर –
थंडीत काजू, बदामाऐवजी तुम्ही खजूरही खाऊ शकता. खजूर शरीराला उबदार ठेवते. ज्यामुळे मेटॅबॉलिजम बुस्ट होण्यास मदत होते. खजूराच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते आणि शरीराला उर्जाही मिळते. रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्यामुळे शरीरात उब निर्माण होते.
पांढरे तिळ –
पांढऱ्या तिळाचे सेवन थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी प्रभावी मानले जाते. तुम्ही पांढऱ्या तिळाचे लाडूही खाऊ शकता. तिळामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
आले –
या दिवसात आले खाणे फायद्याचे ठरेल. आले थर्मोजेनिक गुणधर्मासाठी ओळखले जाते. ज्यामुळे मेटाबॉलिजम क्रिया वाढते. याशिवाय आल्यात अॅंटी-बॅक्टेरियल, अॅंटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. या गुणधर्मांमुळे विविध संसर्गापासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे थंडीत तुम्ही आल्याचा चहा प्यायला हवा, ज्यामुळे शरीर आतून उबदार राहिल.
गुळ –
तुम्ही गुळाचे सेवन थंडीत करायला हवे. गुळाच्या सेवनाने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. गुळामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे घटक असतात, जे थंडीतील सांधेदुखीवर प्रभावी समजले जातात. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करायला हवे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde